मुंबई : अभिनेता सलमान खानला आठवड्यातून दोनवेळा इमेल द्वारे धमकीचा मेल आल्यामुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांनी तपास यंत्रणेद्वारे आरोपीचा शोध घेत राजस्थानातून एका आरोपीस काल अटक केली. आज वांद्रे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी पोलीस कोठडीत : अभिनेता सलमान खानला 18 आणि 24 मार्चला धमकीचे मेल आले होते. पण 24 तारखेचा मेल आल्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला. दुसरा मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी तो मेल ट्रेस केला आणि जोधपूर पोलिसांनाही कळवले. यानंतर त्या व्यक्तीला जोधपूरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव धकद्रम रामलाल सियार असून तो बिश्नोई समाजाचा आहे. आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांचा खुलासा : सलमानला पहिली धमकी 18 मार्च रोजी एका मेलद्वारे आली होती. ज्यात दावा करण्यात आला होता की, लॉरेन्स बिश्नोई हा गोल्डी ब्रार टोळीकडून आला होता. ज्यामध्ये वांद्रे येथे पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्काळ दखल घेत तपासाला सुरूवात करण्यात आली. याचा तपास सकारात्मक दिशेने सुरू आहे, लवकरच या पहिल्या धमकीच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचाही लवकरच खुलासा होईल, असा पोलिसांचा दावा आहे.
महत्वाची माहिती समोर : आरोपीने मेलमध्ये धमकी दिली होती की, पुढचा नंबर तुझा आहे, तयार रहा. तुमचीही अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल. तुम्ही कधीतरी जोधपूरला येऊन दाखवा, बिश्नोई टोळी तुम्हाला भेटेल. पुढील क्रमांक तुमचाच आहे. सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर ही धमकीही बिष्णोई टोळीनेच दिली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, अटक करण्यात आलेला आरोपी कोणत्या टोळीशी संबंधित आहे, हे सांगणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा व्यवसायाने वेटर आहे, त्याला सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवायचे होते, त्यामुळे त्याला धमकावण्यात आल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याचा इतिहास पाहता पोलीस त्याच्या म्हणण्याशी सहमत नसून पुढील तपास सुरू आहे.
सिध्दु मुसेवालांच्या वडिलांना दिली होती धमकी : अटकेत असलेला आरोपी धाकडराम याचा पुर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी पडताळणी केला असता, त्याच्यावर यापूर्वी सरदारपुरा पोलीस ठाणे, राजस्थान येथे 2021 मध्ये कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा सिध्दु मुसेवाला यांचे वडील यांना इमेलव्दारे धमकी दिल्याबाबत मानसा पोलीस ठाणे, पंजाब राज्य येथे 2023 मध्ये भारतीय दंड संविधान कलम 384, 506 अन्वये गुन्हे नोंद आहेत.
हेही वाचा : Akanksha Suicide Case :माझ्या मुलीच्या प्रियकराने तिची हत्या केली! आकांक्षा दुबेच्या आईचा थेट आरोप