मुंबई - काही महिन्यांपूर्वी मुंबईत पत्नीवर आपल्या 3 मित्रांकडून बलात्कार करवणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. अटक करण्यात आलेला 46 वर्षीय आरोपी प्रतिष्ठीत उद्योजक आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयात आरोपीने जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला आहे.
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, तक्रादार महिलेच्या संमतीने आरोपीच्या मित्रांनी तिच्यासोबत शाररीक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, यावर आक्षेप घेत पीडितेचे वकील अॅड. स्वप्ना कोदे यांनी पीडित महिला ही मानसिकदृष्ट्या सक्षम नसून कुठलाही निर्णय घेऊ शकत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
काय आहे प्रकरण? -
आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीने त्याच्या मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. 2017 पासून हा प्रकार सतत घडत होता. पतीने त्याच्या तीन मित्रांकडून आपल्यावर सतत बलात्कार करवला होता. तसेच यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
आरोपी उद्योजक आणि पीडित महिलेला दोन लहान मुले आहेत. पीडितेने घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच मुलांचा ताबा मिळावा यासाठी संबंधित महिला प्रयत्नशील आहे. पीडित महिलेच्या आरोपानुसार, तिच्या पतीने 3 मित्रांसोबत मिळून 'वाईफ स्वॅपिंग' अनेकवेळा केले होते. याबद्दल कोणाकडेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पीडितेने सांगितले