मुंबई : माजी मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार ( Mumbai BJP President MLA Ashish Shelar ) यांच्या गाडीची धडक महिलेच्या दुचाकी वाहनाला लागल्यानंतर चिडलेल्या महिलेने अंगरक्षकांना केलेल्या मारहाण तसेच शिवीगाळ प्रकरणात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिलेला मुंबई सत्र न्यायालयाने ( Bombay Sessions Court ) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. महिलेला 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर ( Bail granted on personal caste ) केला.
राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल : पोलिसांनी राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला असा युक्तिवाद महिलेच्या वकिलांनी केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आरोपी महिलेला दिलासा दिला. त्यामुळे पोलिसांना चपराक बसली आहे. दहा दिवसांपूर्वी आशिष शेलार एका कार्यक्रमासाठी विलेपार्ले येथे जात होते. त्यावेळी माहीम कॉजवेवरून महिला दुचाकीवरून जात होती. यादरम्यान शेलार यांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक बसली. त्यावरून पोलिस आणि आरोपी महिला पूनम पाटील यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यादरम्यान पूनमने पोलिसाला शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खोटी तक्रार दाखल केली असा युक्तिवाद : त्यानंतर अटकेच्या कारवाईच्या भीतीने महिलेने ऍड. श्रीकांत शिरसाट यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. तक्रारदार पोलिसाने वाहतूक नियम मोडून महिलेच्या दुचाकीला धडक दिली आणि नंतर महिलेविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली असा युक्तिवाद ऍड. शिरसाट केला. त्याची दखल घेत सत्र न्यायाधीश के. पी. श्रीखंडे यांनी जामीन अर्जावर निर्णय देईपर्यंत महिलेच्या अटकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर महिलेला 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.