मुंबई: मालकाचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने (stole gold ornaments), नाणी, बिस्कीट आणि विदेशी कंपनीचे घड्याळ चोरी केले. त्या नोकरास बिहार येथून कांदिवली पोलिसांनी 24 तासात अटक (arrested by the Kandivali police from Bihar) केली आहे. फिर्यादी हे महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे राहत असून त्यांच्याकडे बारा वर्षांपासून हाउस कीपिंग मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या नोकराने फिर्यादीच्या राहत्या घरातील कपाटाच्या बनावट चाव्या बनवून लॉकरमधून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या संमतीशिवाय एकूण 41 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, नाणी बिस्किट घडाळे आणि रोख रक्कम यांच्यावर डल्ला मारला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला: या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात नोकरा विरोधात आयपीसी कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 24 तासाच्या आत बिहार येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी नोकर श्रीकांत चिंतामणी यादव (३४) याला अटक करण्यात आली. फिर्यादीने तक्रार दाखल केल्यानंतर कांदिवली पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत गीते, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत भिसे यांच्या पथकास तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी हा त्याच्या मूळ गावी गेल्याची माहिती प्राप्त झाली होती.
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला: त्यावरून आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने पोलिसांचे हे पथक तात्काळ नोकर यादव याच्या बिहार येथील सगदनिधी या मूळ गावी पोहोचले. त्यानंतर चंद्रमंडी स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपी श्रीकांत चिंतामणी यादव याला 24 तासांच्या आत पोलिसांनी अटक केली. अटक आरोपी याच्याकडून भारतीय चलनातील रोख 8 लाख 46 हजार पाचशे रुपये, विविध कंपनीची महागडी घडाळे आणि कॅमेरे त्यांची एकूण किंमत 2 लाख 46 हजार तर सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने यांची किंमत एकूण 35 हजार 35 लाख 91 हजार 46 रुपये असा एकूण 46 लाख 83 हजार 546 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.