ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबईच्या जंगलात फेकले जातात मृतदेह, पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे मोठे आव्हान - dead bodies found in forest

खून करुन मृतदेह मुंबई आणि आजू बाजूच्या जंगलात फेकण्याचे प्रकार अलीकडे वेगवेगळ्या घटनांतून समोर येत आहे. बहुतेकवेळा असे मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत असतात त्यांमुळे त्यांची ओळख पटविने हे पाोलिसांसाठी मोठे आव्हान असते. पण त्यावरही मार्ग काढत पोलीस तपास करत खून्या पर्यंत पोचतात.

Mumbai Crime News
जंगलात सापडलेले मृतदेह
author img

By

Published : Mar 15, 2023, 7:47 AM IST

Updated : Mar 15, 2023, 6:41 PM IST

प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील

मुंबई : वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांड सारखेच काही हत्याकांड घडल्याचे उघडकीस आले आहे. श्रद्धा वालकर या तरुणीचे तुकडे तुकडे करून दिल्लीतील जंगलात फेकून देण्यात आले होते. या प्रकरणाने मुंबईसह दिल्ली हादरून सोडली होती. त्यानंतर नालासोपारा येथील तुळींज येथे ४० वर्षीय पत्नीची हत्या करुन पती फरार झाला होता. काही दिवसांनी कुजलेल्या मृतदेहाचा दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हे प्रकरण समोर आले. नालासोपारा येथील तुळींज परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये असलेल्या बेडच्या आत ४० वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. मेघा शाह असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांसमोर आव्हान : या घटनेनंतर तिचा पती हार्दिक शाह नावाचा आरोपी फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. तुळींज पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेशमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने अटक केली होती. मात्र, जंगलात सापडणाऱ्या मृतदेहांची ओळख पटवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ईटीव्ही भारताला दिली आहे.

आईची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला : मुंबईतील जुहू भागात एक अशी घटना घडली होती. जुहूमधील एका फ्लॅटमध्ये पोटच्या मुलाने स्वतःच्या वृद्ध आईचीच निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. हत्या केलेल्या महिलेचे नाव वीणा कपूर होते. पोटच्या मुलाने आपल्या वृद्ध आईची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह माथेरान येथे फेकला. मात्र, अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला याबाबत संशय आला. त्याने जुहू पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर जुहू पोलिसांनी माथेरानच्या जंगलातून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी मुलासह घरी काम करणाऱ्या सर्व्हंटला अटक केली.

जंगलात रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह : अलीकडेच ६ जानेवारीला जंगलात २१ ते २५ अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कसारा जवळच्या जंगलात घडली असल्याची माहिती कसारा पोलिसांनी दिली. तरुणीच्या मृतदेहावर चाकुचे अनेक वार आढळल्याने हा खुनाचा प्रकार असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आले होते. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. प्रेयसीला फिरण्याच्या बहाण्याने कसाऱ्याच्या जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी संपवल्याची धक्कादायक आणि शहारे आणणारी घटना घडली होती. कसारा पोलिसांनी तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर 24 तासांच्या आत तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा : Amravati crime news: पाहुणे म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला दारू पाजून सामूहिक अत्याचार

Last Updated : Mar 15, 2023, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.