ETV Bharat / state

Wankhede Stadium Security : केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडिअमसह मुंबईची सुरक्षा वाढवली - मुंबई पोलीस

Wankhede Stadium : केरळमधील कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी सकाळी ९ च्या सुमारास भीषण स्फोट (Kerala Blast) झाला आहे. या बॉम्बस्फोटानंतर वानखेडे स्टेडिअमसह मुंबईच्या सुरक्षेत वाढ (Security Of Wankhede Stadium) करण्यात आली आहे.

Wankhede Stadium
वानखेडे स्टेडिअम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 10:16 PM IST

मुंबई Wankhede Stadium : केरळमधील एर्नाकुलम परिसरातील कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी आज सकाळी भीषण स्फोट (Kerala Blast) झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून ३६ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलं नाही. याच बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत देखील सुरक्षेच्या पातळीवर सर्व पावलं उचलली असल्याची माहिती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा : मुंबईत मरिन ड्राईव्ह (Marine Drive) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वानखेडे स्टेडियममध्ये गेल्या काही दिवसांपासून विश्वचषक क्रिकेट सामने (World Cup 2023) खेळले जात आहेत. तेथे देखील काही घातपात घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा (Security Of Wankhede Stadium) वाढवली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील संवेदनशील परिसरात आणि अतिसंवेदनशील परिसरात पोलिसांची सुरक्षा नेहमी असते. मात्र, केरळ येथे आज झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील परिसरांमधील पोलिसांच्या गस्ती वाढवल्या असून संशयित व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.

संशयितांवर करडी नजर : धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देखील पोलिसांचे लक्ष आहे. तर नागरिकांना मुंबई पोलिसांनी आवाहन केलं आहे की, कोणालाही संशयित व्यक्ती अथवा संशयित वस्तू दिसल्यास तात्काळ मुंबई पोलिसांना कळवावे. केरळ येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह राज्यातील दहशतवाद विरोधी पथक देखील सक्रिय झाले आहे. तर संशयितांवर करडी नजर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पोलिसांचा असणार खडा पहारा : इस्राईलवर हमासने ७ ऑक्टोबरला हल्ला (Israel Hamas War) केल्यानंतर जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतरच मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईत राहणारे इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी यांच्या लोअर परळ येथील कार्यालय परिसरात आणि निवासस्थान परिसरात पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इस्राईल हमास यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासूनच मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Sessions Court News : वानखेडे स्टेडियमवरील तिकीट नुकसान भरपाईच्या याचिका सत्र न्यायालयानं फेटाळल्या; नेमकं प्रकरण काय?
  2. Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारला जाणार सचिनचा भव्य पुतळा! जाणून घ्या कधी होणार उद्घाटन
  3. Sachin Tendulkar Statue : उद्घाटनापूर्वीच पाहा वानखेडे स्टेडियमवरील सचिनचा पुतळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.