मुंबई - महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांट निविदेत घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा खुद्द महाविकास आघाडी सरकारमधील मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. अस्लम शेख यांच्या या आरोपांमुळे आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काळ्या यादीत नाव असलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिल्याचा आरोप अस्लम शेख यांच्याकडून करण्यात आला आहे. याची तक्रार अस्लम शेख यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीशी हातमिळवणी करत भ्रष्टाचाराचा हा घाट घातला असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रातून केला. तसेच दुसरी जयपूरमधील सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालय ही कंपनीही कळ्या यादीत आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात 16 ऑक्सिजन प्लांट अपूर्ण ठेवणाऱ्याला कंपनीला पुन्हा काम देणे योग्य ठरणार नाही, असेही अस्लम शेख यांनी आपल्या पत्रात म्हंटल आहे.
320 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप
हा गैरव्यवहा 320 कोटींचा असल्याचा आरोप करत अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. मुंबई नियोजित ऑक्सिजन प्लांट तयार होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच मुंबई महापालिकेने हायवे कस्ट्रक्शन या कंपनीला ऑक्सिजन जनरेटर बसविण्याचे काम दिले असल्याचा आरोप अस्लम शेख यांनी आपल्या पत्रातून केला आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानातील प्राणिसंग्रहालयात पेंग्विन संलग्न प्रकल्पात संबंधित कंपनीला दंड आकारण्यात आला आहे. तसेच मुंबईतील ऑक्सीजन प्लांट संदर्भातील कामे संबंधित कंपनीने पूर्ण केलेली नाहीत. तरीही हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आता थेट पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवत मूळ किंमतीपेक्षा अधिक पैसे हायवे कस्ट्रक्शन या कंपनीला दिले जात असून या प्रकरणी 320 कोटी रुपयांचा घोटाळा होत आपल्याचा आरोपही अस्लम शेख यांनी पत्रात केला आहे. याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.
हेही वाचा - 11th CET exam 21 ऑगस्टला होणार; आजपासून नोंदणी सुरू