मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ( Savarkar ) यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जोरदार निषेध ( Rahul Gandhi statement condemned ) भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईत दादर येथे करण्यात आला. यावेळी बोलताना भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ( BJP women state president Chitra Wagh ) म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कोणीही खपवून घेणार नाही.
सावरकरांवर विनाकारण आरोप - इंदिरा गांधी सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढता आहेत. राहुल गांधी विनाकारण आरोप करत असल्याचे त्या म्हणाल्या. राहुल गांधी स्वतःच्या आज्जीला इंदिरा गांधींना खोटं पाडताहेत का? इंदिरा गांधी चुकीच्या होत्या हे राहूल गांधीनं जाहीर करून टाकावे. अशी प्रतिक्रिया वाघ यांनी दिली आहे. दोन गांधी पैकी खरं कोण बोलतेय, खोटं कोण बोलतेय हे उघड व्हायला हवं असेही त्या म्हणाल्या.