मुंबई: नागपूरचे वकील सतीश उके यांच्यावर ईडीने धाड टाकली. संघ आणि भाजप विचाराचे विरोधक म्हणून उके ओळखले जातात. फक्त विरोधक नाही तर भाजपच्या तीनतीन दिग्गज नेत्यांविरोधात उके केसेस लढत आहेत. म्हणूनच त्यांच्यावर ईडीची धाड पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर फडणविसांनी उकेंवर प्लाॅटच्या व्यवहारात झालेल्या तक्रारीवरुन ही कारवाई झाली. तसेच उकेंना या पुर्वी न्यायाधिशां विरोधात खोट्या तक्रारी केल्या म्हणुन शिक्षा झालेली आहे असा आरोप केला होता. पाहूया कोण आहेत हे भाजपचे नेते आणि या नेत्यां विरोधातल्या कोणत्या केसेस उकेंकडे आहेत. उकेंची अटक भाजपच्या नेत्यांवर बुमरँग होणार का? या निमित्ताने उकेच अडकणार हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
फडणवीस यांच्या विरोधात खटला: देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सतीश उके यांनी याचिका दाखल केलेली आहे. यात फडणवीसांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर दाखल असलेले फौजदारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही. अशी याचिका दाखल आहे तीची सुनावणी पूर्ण झालेली नाही. ऑक्टोबरपासून पुराव्यांची तपासणी सुरू करण्याचे आदेश प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. यात फडणवीस यांच्या विरोधात आरोप सिद्ध झाले तर 6 महिने कैद 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2019 पासून हा खटला सुरु आहे. फडणवीस यांच्यावर कलम 420, 467, 468 कागदपत्रांमध्ये हेराफेरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 1999 आणि 2000 मध्ये फडणवीस यांनी या प्रकरणात जामीन मिळवला होता.
नितीन गडकरी यांच्या विरोधातही खटला - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विरोधात याचिका दाखल केली लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या अर्जामध्ये चुकीची माहिती दिली असा दावा नाना पटोले यांनी या याचिकेत केला होता. या प्रकरणात सतिष उके नाना पटोले यांचे वकील आहेत. पटोले यांच्या बाजूने ते गडकरीं विरोधात न्यायालयात बाजू मांडत आहे.
चंद्रशेखर बावांकुळे विरोधात खटला काय : काही दिवसांपूर्वी उकेंनी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले. बावनकुळे हे 5 हजार कोटींचे मालक आहेत त्यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसे आहे. त्यांच्याकडे 4 महागड्या गाड्या आणि 5 फ्लॅट आहेत असे गंभीर आरोप सुरज तातोडे या व्यक्तीने केले होते. सूरज हे बावनकुळे यांचे नातेवाईक आहेत. उके यांनी सुरजला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. दुसरीकडे बावनकुळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि उके विरोधातच मानहानीची नोटीस पाठवली होते.
या केसेसशीही उकेचा संबंध : फोन टायपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाना पटोले यांनी दाखल केलेल्या याचिकेत सतीश उके हेच पटोलेचे वकील आहेत. न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणातही उकें महत्त्वाचा धागा आहेत. न्यायाधीश लोया आपल्याशी व्हिडिओ कॉल द्वारे बोलले होते. त्यांच्यावर दबाव होता असा दावा उके यांनी केला होता. ते स्वतः या प्रकरणात कोर्टात गेले होते. याशिवाय गाव गुंड मोदी या विधानामुळे पटोले अडचणीत आले होते तेव्हा सतिष उके यांनी कथित गावगुंड मोदीला सर्वांसमोर आणले होते. फडणवीस यांच्यावर निमगडे हत्याकांड प्रकरणात आरोप झाले त्या निमगडे हत्याकांडात वकील सतिष उके आहेत. त्यातच नाना पटोले यांच्याशी त्यांची जवळीक लपून राहिलेली नाही.
हेही वाचा : Chitra Wagh Reply To Satej Patil : 'माझ्या नवऱ्याची एकतरी भानगड काढून दाखवा, मी राजकारण सोडेल'