ETV Bharat / state

Taxi Drivers Struggle : संसाराचा गाडा हाकत सारिकाच्या हातात टॅक्सीचे स्टेअरिंग - Sarika struggle to become

पुरुषांची मक्तेदारी मोडत मुंबईमध्ये गेल्या आठ महिन्यापासून सारिका रणदिवे ही महिला टॅक्सी चालवत आहे. या क्षेत्रात 99 टक्के पुरुषांचे वर्चस्व आहे. मात्र, याला छेद देण्याचं काम मुंबईत मानखुर्द येथे राहणाऱ्या सारिका रणदिवे यांनी केला आहे.

Taxi Drivers Struggle
सारिकाच्या हातात टॅक्सीचे स्टेअरिंग
author img

By

Published : Jan 11, 2023, 10:23 PM IST

संसाराचा गाडा हाकत सारिकाच्या हातात टॅक्सीचे स्टेअरिंग

मुंबई -मुंबईत सर्वत्र दिसणारी काळी पिवळी टॅक्सी ही नेहमीच पुरुष ड्रायव्हर चालवताना पाहायला मिळतात. मात्र, या सर्वांची मक्तेदारी मोडत मुंबईमध्ये सारिका रणदिवे ही महिला गेल्या आठ महिन्यापासून मुंबईत टॅक्सी चालवतात. अगदी हलाकीच्या परिस्थितीतून त्यांचा मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर होण्यापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे.

मुंबईची जीवन वाहिनी म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. त्याचप्रमाणे मुंबईत कानाकोपऱ्यात धावणाऱ्या टॅक्सी देखील मुंबईचा अविभाज्य घटक आहे. मात्र, मुंबईत चालणाऱ्या टॅक्सी या क्षेत्रावर नियमित पुरुषी मक्तेदारी राहिली आहे. आजही मुंबईतच्या काळी पिवळी रंगाची टॅक्सी चालते. त्यात 99% पुरुष ड्रायव्हर आहेत. मात्र, याला छेद देण्याचं काम मुंबईत मानखुर्द येथे राहणाऱ्या सारिका रणदिवे यांनी केला आहे.

घरची परिस्थिती हालाखीची - पुरुषी मक्तेदारी असलेल्या टॅक्सी ड्रायव्हिंगच्या व्यवसायात मोठ्या जिद्दीने सारिका रणदिवे या गेल्या आठ महिन्यापासून मुंबईत टॅक्सी ड्रायव्हिंग करत आहेत. टॅक्सी ड्रायव्हर बनण्याची त्यांची कथाही मोठी रंजकच आहे. सारिका रणदिवे ह्या मानखुर्द परिसरात राहतात. त्यांची घरची परिस्थिती ही हालाखीची होती. एका इलेक्ट्रॉनिक दुकानात साफसफाईचे काम, काही घरांमध्ये घरकाम करण्याची कामे सारिका गेल्या अनेक वर्षापासून करत होत्या.

वेगळं करण्याची जिद्द - घरी पती, तीन मुलं असून त्यांचे पती ही ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतात. मात्र पती-पत्नी दोघेही नोकरी करत असूनही घरातला गाडा हाकणे कठीण झाले होते. त्यामुळे वेगळं काही करून चार पैसे पदरात पाडता येतील का? याची चाचपणी सारिका यांनी सुरू केली होती. सारिका या एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कामावरून परत असताना जोराचा पाऊस सुरू होता.

सामाजिक कार्यकत्याची मदत - हलाखीच्या परिस्थितीमुळे सारिकाच्या पायात चप्पल देखील नव्हती. जवळ छत्री नसल्यामुळे आडोसा घेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचण्याची घाई सारिका करत असतानाही अवस्था पोपट धाते या गृहस्थांनी पाहिली. सारिका यांची अवस्था पाहून दाते यांनी त्यांना आधी चहा नंतर बिस्किटे खायला दिली. चहा घेता घेता त्यांच्याबद्दल सर्व माहिती त्यांनी विचारल्यानंतर त्यांना मदत करण्याचं आश्वासन धाते यांनी दिलं.

टॅक्सी ड्रायव्हर क्षेत्रात उतरण्याचा निर्णय - पोपट धाते हे सामाजिक चळवळीत आहेत. महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून ते निवृत्त सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी काम करतात. सारिकाची ही अवस्था पाहून गरीब महिलेला मदत करावी असा निश्चय त्यांनी केला. केवळ घरकाम करून कुटुंबाची आर्थिक स्थिती बदलणार नाही याची जाणीव सारिकाला त्यांनी करून दिली. त्यानंतर पोपट धाते यांनी सारिका रणदिवे यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांना काय करता येऊ शकेल याची चाचपरी त्यांच्या बोलण्यातून त्यांनी घेतली. मुंबई कुठेच महिला टॅक्सी ड्रायव्हर दिसत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी उतरावे, ड्रायव्हिंग शिकावी असा सल्ला सारिका यांना दिला.

ड्रायव्हिंग शिकवण्यास सुरुवात - 2019 साल होतं. सारिका यांनी मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन ड्रायव्हिंग घेण्याचे धडे घेतले. यासाठी काही पैसे सारिका यांनी तर काही पैसे पोपट धाते यांनी दिले. मात्र, ड्रायव्हिंग त्यांना सुरुवातीला काही जमत नव्हते. म्हणून नंतर स्वतः पोपट धाते यांनीच आपल्या चार चाकी वाहनावर त्यांना ड्रायव्हिंग शिकवण्यास सुरुवात केली. मध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यामध्ये काहीसा खंड पडला. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा गाडी शिकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर केवळ दोन महिन्यात सारिका यांनी गाडी शिकून घेतली.

सारिका थेट गाडी घेऊन घरी पोहोचल्या - आपण चार चाकी गाडी चालवायला शिकत आहोत हे सारिका यांनी गाडी शिकतेवेळी घरी कोणालाही कळू दिलं नव्हतं. त्यांचे पती स्वतः भाजीने आण करण्याचा टेम्पो चालवतात. त्यामुळे घरून त्यांना विरोध होईल असं वाटलं होतं. मात्र, गेल्या वर्षी 2022 च्या सुरुवातीला एखादी सेकंड हॅन्ड गाडी घेण्याचा निश्चय सारिका यांनी केला. मात्र. यासाठी पैशाची जुळवाजुळ पुन्हा कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.

बँकेची मदत - काही पैसे कामाच्या माध्यमातून त्यांनी जोडले होते. मात्र गाडी घ्यायला तेवढे पैसे पुरेसे नव्हते म्हणून बँकेकडून लोन करत जुनी टॅक्सी, त्याचे परमिट त्यांनी विकत घेतलं. मुंबईत सारिका टॅक्सी चालवू लागल्या. मात्र टॅक्सी विकत घेण्याआधी त्यांनी कोणतीही कल्पना आपल्या घरच्यांना दिली नव्हती. एक दिवशी थेट टॅक्सी घेऊनच त्या घरी पोहोचल्या आणि सर्व घरच्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सारिका यांचे पती स्वतः ड्रायव्हर आहेत तर, त्यांची तीन मुलं अद्याप शिक्षण घेतात. त्यातली मोठी मुलगी आकांक्षा बारावीत अमृता सातवी तर, श्रेयश हा चौथीत शिक्षण घेत आहे.

टॅक्सी ने सन्मान दिला - आधी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण चार घरात घर कामे करत होते. मात्र, आज अभिमानाने मुंबईत आपली स्वतःची टॅक्सी चालवत आहोत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गेटवे ऑफ इंडिया, दादर अशा परिसरात टॅक्सी चालवून आज आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत आहेत. टॅक्सी चालवल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारायला मोठी मदत झाली असल्याचं आता सारिका रणदिवे सांगतात.

टॅक्सीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न - आज मुंबईत अनेक जण आपल्याला महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखतात. याचा आपल्याला अभिमान वाटतो असे सारिका म्हणतात. कोविड काळ सर्वांसाठीच दुखत आठवण म्हणून गेलेला आहे. आपल्यासाठी ती वेळ कठीणच होती. घरकाम करत असताना अनेक अडचणी समोर आल्या खास करून आर्थिक अडचणींना मोठे तोंड द्यावा लागलं होतं. मात्र त्या परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबाला सावरत आज टॅक्सी विकत घेतली आहे. टॅक्सीच्या माध्यमातून उत्पन्न चांगलं झाल असल्यासही सारिका म्हणतात.

महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देण्याची गरज - सारिका आज मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ठामपणे उभ्या राहू शकल्या. त्या केवळ सामाजिक कार्यकर्ते पोपट धाते यांनी सारिका यांना मदतीचा हात दिला. मात्र मुंबईत राज्यांमध्ये शेकडो महिलांना मदतीची गरज आहे. मी आज एक महिलेला मदत केली तर, ती महिला पुढे होऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित करत आहे. तसेच राज्य सरकारने लक्ष देऊन महिलांसाठी एखादा ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल काढल्यास त्याचा मोठा फायदा महिलांना होऊ शकतो. या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षित होऊन महिला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनतील असं मत सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन मुख्य प्रवर्तक संघटक सचिव पोपट धाते यांनी व्यक्त केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.