मुंबई MLA Disqualification Case : शिंदे गट (शिवसेना) आमदार अपात्र प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशीही सुनावणी पार पडली. दरम्यान, उद्या देखील सकाळी ११ वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. आज दिवसभर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Advocate Mahesh Jethmalani) यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची साक्ष घेत, उलट तपासणी केली. यावेळी 21 जून 2022 रोजी स्वःताच्या अधिकारात व्हिप बजावला होता की, अन्य कोणाच्या सांगण्यावरुन, तसेच ठाकरेंनी व्हीपसाठी लिखित की, तोंडी सूचना केल्या होत्या? असे प्रश्न सुनील प्रभूंच्या व्हीपवर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी विचारलं. यानंतर उत्तर देताना प्रभू म्हणाले की, पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर बैठक बोलावली होती, असं प्रभूंनी उत्तर दिलं. परंतु आज दिवसभर व्हीपवरुनच प्रभूंची साक्ष घेण्यात आली.
जेठमलानींनी कोणते प्रश्न प्रभूंना विचारले?
जेठमलानी - आपण कुठल्यावेळी व्हीप इश्यू केला हे आठवतंय का ?
प्रभू - मी विधिमंडळ कार्यालयात आलो. माझ्यासोबत आमच्या पक्षाचे काही विधिमंडळ सदस्य होते. आम्ही मताचे विभाजन कसं झालं याचं गणित कागदावर मांडत होतो.
जेठमलानी - तुम्ही इतकं का सांगताय, थेट सांगा किती वाजता व्हीप काढला.
प्रभू - मला पार्श्वभूमी सांगू द्या.
जेठमलानी - आपण म्हटलं आहे की, रात्री उशिरा व्हीप जारी केला, तेव्हा 20 जून होती पण व्हिपवर खरी तारीख 21 जून आहे.
प्रभू - मी आपल्याला म्हटलं की, व्हीप जारी केला तेव्हा साडेअकरा, बारा वाजले होते. म्हणजे दिवस संपला होता. त्यामुळं मी 21 तारीख टाकून व्हीप वाटण्यास सुरुवात केली होती.
जेठमलानी - व्हिपचे वाटप सुरु केलं असं म्हटलं आहे, व्हिपचे वाटप कोणत्या प्रकारे केले?
प्रभू - मी जसं म्हटले आहे की, माझ्यासोबत होते, त्यांना तात्काळ रात्री दिले. जे आमदार निवासाला होते, त्यांना व्हीप पाठवून सुपूर्द केलं. परंतु जे ट्रेस होत नव्हतं त्यांना whatsap वर पाठ्वण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.
नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष) - प्रभू साहेब प्रश्नाचा मूळ गाभा लक्षात घेऊन उत्तर द्या. स्पेसिफिक उत्तर द्या.
जेठमलानी - तुम्ही अंदाजे वेळ सांगा ना? हे का सांगताय.
प्रभू - अंदाजे 10.30 ते 11.30 वाजता मी व्हीप काढला. मला पक्षप्रमुखांचा फोन आला आणि मी व्हीप काढला. कार्यालयातून व्हीप काढला आणि जे संपर्कात येत होते, त्यांना व्हीप देण्यास सुरुवात केली तेव्हा रात्र झाली होती.
समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत : ही सुनावणी संपल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, आज दिवसभर व्हीपवरुन आमच्या वकिलांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता, यावर त्यांची साक्ष घेतली. यावेळी प्रतोद सुनील प्रभू यांनी फिरून फिरुन तीच आणि सारखीच प्रश्नांची उत्तर देत होते. त्यामुळं वकीलांचे समाधान झाले नाही, त्यामुळं उद्या देखील व्हीपवरुनच प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष घेण्यात येणार आहे.
हा वेळकाढूपणा : या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, आज दिवसभर प्रतोद सुनील प्रभू यांना उलटसुलट आणि तेच-तेच प्रश्न विचारण्यात आले. सारखेच प्रश्न विचारुन शिंदे गट व त्यांचे वकील वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी केला.
सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला : ही सुनावणी संपल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat Reaction) यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आज दिवसभर व्हीपवरुन आमच्या वकीलांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता, यावर त्यांची साक्ष घेतली. यावेळी प्रतोद सुनील प्रभू यांनी फिरून फिरुन तिच व सारखीच प्रश्नांची उत्तर देत होते. त्यामुळं वकीलांचे समाधान झाले नाही, त्यामुळं उद्या देखील व्हीपवरुनच प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष घेण्यात येणार आहे.
हेही वाचा -