ETV Bharat / state

Sanjay Raut Reaction : भाजपच्या लोकांना अक्कल आहे का? इतिहासाचा अभ्यास करा- संजय राऊत - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात (statement birth of Dr Babasaheb Ambedkar) झाला, असे विधान केले होते. या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना अडचणीत आणत राऊत यांनी बाबासाहेबांचा अपमान केला असे सांगितले होते. यावर राऊतांनी भाजप नेत्यांचा मेंदू सडला असून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करायला, अशी प्रतिक्रिया दिली (Sanjay Raut Reaction on criticism of BJP) आहे.

Sanjay Raut Reaction
संजय राऊत
author img

By

Published : Dec 16, 2022, 11:36 AM IST

मुंबई : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल केल्यानंतर त्यांच्यावर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला (statement birth of Dr Babasaheb Ambedkar) होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांचा मेंदू सडला असून त्यांनी इतिहास जाणून घ्यायला हवा, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर उद्याच्या महामोर्चाला सरकारला परवानगी द्यावीच लागेल, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील असेही संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारला ठणकावून सांगितले आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत (Sanjay Raut Reaction) होते.

मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईतील महामोर्चाला परवानगी मिळेलच, जर तसे झाले नाही तर त्याचे अर्थ उलट निघतील. त्याचे परिणाम वाईट होतील, असे संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे - फडणवीस सरकारला ठणकावून सांगितले आहे. तसेच हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा आहे. सीमावाद, महाराष्ट्रातील उद्योग, महापुरुषांविषयी केली जाणारी बेताल वक्तव्य या विरोधात हा महामोर्चा आहे. महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय होत असताना शिंदे - फडणवीस सरकार गप्प बसले आहे, म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र प्रेमींना आवाहन केले आहे की, या मोर्चात सहभागी व्हा. जर का हे सरकार या मोर्चाला परवानगी नाकारत असेल तर, महाराष्ट्र प्रेमी विरोधी हे सरकार राज्यात बसले आहे, असे समजावे लागेल. हा मोर्चा विरोधी पक्षांचा नव्हे, तर महाराष्ट्र प्रेमींचा आहे. असेही राऊत म्हणाले. लोकशाही पद्धतीने सरकार बसलेले आहे. तर आम्ही सुद्धा लोकशाही पद्धतीने मोर्चाचे आयोजन केले आहे. आम्ही कुठलेही घटनाबाह्य काम करत नाही. सत्तेवर बसलेले सरकार लोकशाही प्रक्रियेला विरोध करत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने चाललेलो आहोत आणि त्याच मार्गाला जाऊ आणि त्याच मार्गाने तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू, असेही राऊत (Sanjay Raut Reaction on criticism of BJP) म्हणाले.

तेव्हा मुंबई प्रांत : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे वक्तव्य काल संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना अडचणीत आणत राऊत यांनी बाबासाहेबांचा अपमान केला असे सांगितले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, यात अपमान काय आहे? भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे मेंदू हे किडे व मुंग्यांचे मेंदू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? हा माझा प्रश्न आहे. आम्ही म्हटले आहे ते आमचे आहेत. डॉ. बाबासाहेब यांचा जन्म मध्यप्रदेश, मेहूमध्ये झाला. तेव्हा मध्य प्रदेश नव्हता. महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश कधी निर्माण झाले, हे त्यांना समजते का? जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा या देशांमध्ये कुठलेही राज्य नव्हते. फक्त मुंबई प्रांत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. या महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाला घटना दिली आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात जन्मले हे देशाचे भाग्य आहे. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. हे त्याहीपेक्षा मोठे भाग्य आहे, असे सांगत, भाजपला हे माहित नाही म्हणून त्याची टीका सुरू आहे, असेही राऊत (criticism of BJP On statement) म्हणाले.

नेते दलाल आहेत : नाशिकच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी नगरसेवकांनी आज मातोश्री येथे शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,
ते दलाल आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे, त्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत. त्यांच्यावर दबाव आणून त्यांना प्रवेश दिला आहे. त्यांना श्रद्धा, निष्ठा, विचार काही नाही आहे. जे शिंदे गटात गेलेले आहेत, त्यांचा सर्वांचा व्यवसाय दलाली आहे. कंत्राटदार, ठेकेदारी करणे ही त्यांची कामे आहेत. २०२४ला हे सर्वजण आमच्या दारात परत येतील, परंतु पुन्हा त्यांना आम्ही आमच्या दारात घेणार नाही, असा विश्वासही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.