ETV Bharat / state

Sanjay Raut On Pm Modi : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - भाजपाला एनडीएची आठवण

Sanjay Raut On Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सनातन धर्मासाठी गरज नाही, त्यासाठी शिवसेना इथं बसली आहे, असा टोला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut On Pm Modi
खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 2:58 PM IST

मुंबई Sanjay Raut On Pm Modi : 'इंडिया' स्थापन होण्यापूर्वी भाजपाला एनडीएची आठवण कधीच झाली नाही. तेव्हा 'मोदी अकेला ही काफी है' असं भाजपावाले नेते म्हणत होते. मात्र इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपाला एनडीएची आठवण झाल्याचा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, असं भाकितही संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. संजय राऊत हे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

  • #WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) Rajya Sabha MP Sanjay Raut says, "When we formed INDIA alliance that is when they remembered NDA... Till then it was 'Modi akele kafi hai'... But the moment INDIA alliance was formed, (PM) Modi was not enough alone, they needed more support... Jis… pic.twitter.com/tboYbwDJLY

    — ANI (@ANI) September 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बेकायदेशीर सरकार चालवायला समर्थन : संजय राऊत म्हणाले की, आम्ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत आहोत, असा आमच्यावर आरोप होत आहे. परंतु हा दबाव आमचा नाही, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. विधानसभा अध्यक्षांनी घटनेचं रक्षण करण्याची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात गेल्या एक वर्षापासून या महाराष्ट्रात घटनेचा, कायद्याचा खून होताना दिसत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर त्यांना काही वाटत नसेल, तर विधिमंडळाच्या इतिहासाचं काळं पान त्यांच्या नावावर लिहिलं जाईल, असा टोलाही संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना लगावला. बेकायदेशीर सरकार चालवायला आपण समर्थन देत आहात, हे कितपत योग्य आहे, याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरुन जनतेच्या मनात रोष : सध्या विधानसभा अध्यक्ष यांच्या भूमिकेवरुन जनतेच्या मनामध्ये रोष असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या रोषाची किंमत जे या कटात सहभागी आहेत, त्या सर्वांना चुकवावी लागणार असल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षात थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल, तर ते 16 आमदारांचा राजीनामा ताबडतोब घेतील. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. तसंच 2024 पूर्वी भाजपा व सुधीर मुनगंटीवार यांचं अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे, असंही राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सध्याची एनडीए ही एक नौटंकी आहे. 'इंडिया' निर्माण झाल्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती. त्यानंतर त्यांनी सर्व बाजूनं लोक जमा करुन एनडीए म्हणून दिल्लीत बैठक घेतली. आम्ही 'इंडिया'ची स्थापना केल्यावर यांना एनडीएची आठवण झाली असून त्या अगोदर 'पंतप्रधान मोदी एकटे पुरेसे' आहेत, असं त्यांना वाटत होतं. परंतु 'इंडिया'च्या स्थापनेनंतर आपली ताकद वाढवावी लागेल, हे त्यांना समजून चुकलं, असंही संजय राऊत म्हणाले.

एनडीएची ताकद शिवसेना आणि अकाली दल : अण्णा द्रमुकनं एनडीएची साथ सोडली, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आणि अकाली दल नसेल, तर एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकद शिवसेना आणि अकाली दल होती. आता एनडीए अस्तित्वात नाही. 2024 च्या पूर्वी भारतीय जनता पक्षही फुटलेला असेल, असा ठाम विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सनातन धर्मासाठी मोदींची गरज नाही : एनडीए सनातन धर्मविरोधी असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. याविषयी बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. सनातन धर्माचं कुणीही समूळ उच्चाटन करूच शकत नाही. अण्णाद्रमुक ही भाजपासोबत होती. पण त्यांचीही भूमिका सनातन धर्मविरोधी आहे. सनातन धर्म हा जगभरात कायम राहील. पंतप्रधान मोदींनी सनातन धर्माची चिंता करण्याची काही एक गरज नाही. भाजपानं सनातन धर्माच्या निर्माण व संरक्षणाचा ठेका घेतलेला नसून इथं शिवसेना बसली आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींची गरज नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. Rahul Shewale Defamation Case: बदनामीच्या खटल्यातून आमचे नावं वगळा.. उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांचा न्यायालयात अर्ज दाखल
  2. Sanjay Raut : 'राज्यात दोन भामटे आणि एका ठगाची युती', संजय राऊतांची जळजळीत टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.