ETV Bharat / state

Shabhuraje Desai On Sanjay Raut: संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही- शंभुराज देसाई यांचा इशारा

Shabhuraje Desai On Sanjay Raut: : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला असून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. सीमाप्रश्नावर क्रेद्रांने लक्ष घालावं, यासाठी मुख्यामंत्र्याकडून प्रयत्न सुरू

Shabhuraje Desai On Sanjay Raut
Shabhuraje Desai On Sanjay Raut
author img

By

Published : Dec 7, 2022, 11:10 AM IST

Updated : Dec 7, 2022, 1:08 PM IST

मुंबई: महाराष्ट्र- कर्नाटक वाद चिघळला असताना, राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने विरोधकांनी यावरून मुख्यमंत्री शिंदे यांचा समाचार घेत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोपांची राळ उठवली. मंत्री शंभूराजे देसाई यांनी संजय राऊत यांच्या आरोपान जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी तोंड आवरावं, बेळगाव बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देसाई यांनी दिला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न मागे पडला असून राऊत आणि देसाईंमध्ये जुंपली आहे.

आमची भाईगिरी आमची ताकद: खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादावर शिंदे सरकारवर ठाकरे स्टाईल हल्लाबोल सुरू केला आहे. शिंदे सरकार सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाही. मला भाई म्हटले जाते, भाई सारखं काम करावं, असा घणाघात चढवला होता. शंभूराज देसाईंनी यावर उत्तर दिले. आमची भाईगिरी आमची ताकद पाच महिन्यापूर्वी आम्ही राऊतांना दाखवली आहे, देसाई म्हणाले.

केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कालच्या सीमाभागातील परिस्थितीवर वक्तव्य करताना शिंदेवर टिका केली याचा मी जाहिर धिक्कार करतो. शिंदे साहेब केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे मांडत आले आहेत. कर्नाटक न्याय व्यवस्थेकडून आलेली नोटीस याला उत्तर देण्यासाठी ते गेले नाहीत, न्यायालयाचे कवच कुंडल होते तरी गेले नाहीत. मग किती त्यांची फाटली असेल, असा सवाल देसाईंनी उपस्थित करत संजय राऊत यांनी तोंड आवरावे, तुम्हाला आता हे बाहेरचं बोलणे मानवत नाही. दोन महिन्यांनी बाहेर आले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंपेक्षा त्यांना पवारांचं नेतृत्व जवळचं वाटते, हेच आम्ही उद्धव ठाकरेंना वेळोवेळी सांगत होतो. संजय राऊत यांनी त्यांच्या नेतृत्वाचे स्थान बदलले आहे. राऊतंनी बेळगाव प्रश्नावरून कधी लाट्या काटया खल्या का ? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. शिंदेंनी बेळगाव प्रश्नावरून किती दिवस जेलमध्ये काढले हे विधान भवनात सांगितल्याची आठवण देसाईंनी करून दिली.

पहिल्यांदा वाहनांवर दगडफेक: गेल्या अडीच वर्षात ज्यांनी काहीचं केले नाही. उगाच फेसबुकवर सरकार चालवतात यांनी आम्हाला शिकवू नये. आम्हाला पायपुसनी म्हणणार्यांनी दिल्लीत काॅग्रेसपुढे कसे वाकले ते महाराष्ट्रानी पाहिले आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. एक काळ असा होता की लोक मातोश्रीवर भेटीला यायचे. आता त्यांचे पुत्र यांना त्याच्या दारात जावे लागत आहे, ही शोकांतिका असल्याचे देसाईंनी म्हटले. पहिल्यांदा वाहनांवर दगडफेक झाली. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तेथील पोलिस महासंचालकांशी बोलणं झाले. आता प्रकरण निवळलं आहे. पवार साहेबांना माहित होत, परिस्थिती नियंत्रणात येईल म्हणूनच त्यांनी इशारा दिल्याचे देसाईंनी सांगितले. आपण एसटी बसेस थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही. बसेसच नुकसान होऊ नये त्यांनी थांबवल्या, कर्नाटक सरकारने पोलिस सुरक्षा देण्याचे आश्वासन दिलेले आहे. गाड्या आता पूर्वरत होतील, असेही देसाईंनी स्पष्ट केले.

बडबड बंद करा, अन्यथा जशास तसे उत्तर: संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते कधी लोकांमध्ये कधीही निवडून आलेले नाहीत. हे आमच्या जीवावर निवडून आले आहेत. आम्ही शिंदेसाहेबांना त्यावेळी सांगितलं होतं वेळ आली आहे. पण शिंदे साहेब बोलले म्हणून आम्ही मतदान करत निवडून आणले. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ८५० गावांची भावना महाराष्ट्रा सोबत आहेत. केंद्राकडे आम्ही तशी मध्यस्थीची मागणी केली आहे. बोम्मई त्यांच्या राज्याची भूमिका मांडत आहे. आम्ही आमची मांडू, मात्र संजय राऊत यांनी तोंडाला लगाम द्यावा, अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला.

Last Updated : Dec 7, 2022, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.