मुंबई - आमचे राज्यपाल करूणेचे सागर आहेत आणि महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. त्यामुळे करूणेचा उगम महाराष्ट्रतूनच झाला म्हणून राज्यपालांना महाराष्ट्रत रामावेसे वाटते. या करुणा भावनेतून त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी आणि राज्यपाल नियुक्त 12 सदस्य त्यांनी मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते मोकळे करावे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह -
मागील पाच महिन्याहून अधिक काळ लोटला असला, तरी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रश्न महा विकास आघाडी सरकारला मार्गी लागलेला नाही. सरकारने हा विषय सोडवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. एकूण असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना समान अशा प्रत्येकी चार-चार सदस्यांची नावे राज्यपालांना कळवण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यलांनी यावर निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु राज्यपालांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावरून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.