मुंबई : राज्य विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना - भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला. फडणवीस यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी उरकला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांची सहमती होती. भाजप आणि पवारांमध्ये बैठका झाल्या. परंतु, ऐनवेळी पवारांनी माघार घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
फडणवीसांकडे नवीन मुद्दा नाही : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या कोणताही नवीन मुद्दा राहिलेला नाही. राज्यात त्यांनी स्थापन केलेले सरकार देखील औटघटका मोजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची मुदत ही निम्मी संपली आहे. त्यामुळे 100 टक्के सरकार पडणार असल्याने ते झोपेत किंवा जागेपणी बडबडत आहेत. फार काही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा हल्लाबोल यावेळी राऊतांनी केला.
फडणवीसांच्या आरोपाला सडेतोड प्रत्युत्तर : शरद पवारांनी अमुक केले वगैरे, फडणवीस आता बोलत आहेत. ठीक आहे, त्यात नवीन काय आहे? शरद पवारांनी काय केले? आणि आता हे तुम्ही सांगत आहात. परंतु, तुम्ही केलेला एक प्रयोग फसला असून तुमच्या अंगाशी आला आहे. लोकांनी तुमच्याकडे आता गांभीर्याने पाहिले नाही, असे राऊत यांनी सांगत फडणवीसांना खडसावले. तसेच डबल गेमची गोष्ट सोडा, महाविकास आघाडी एकत्र आली. सरकार बनले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पवारांनी त्यावेळच्या सरकारला पूर्णपणे समर्थन दिले, हे सत्य आहे. त्यामुळे सकाळी कोणती शपथ घ्यायला सांगण्यात आली होती, हा तुमचा प्रश्न असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा :
- लोकनेत्यांच्या नातवाने शेण खाल्ले..राऊतांची टीका झोंबली; शंभूराज देसाईंनी पत्रक काढून दिला 'हा' इशारा...
- Pratavarao Jadhav On Sanjay Raut: खा. प्रतापराव जाधव यांची जीभ घसरली, संजय राऊतांवर केली हीन शब्दात टीका
- Sanjay Raut Defamation Claim: संजय राऊत यांचा किरीट सोमय्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा; जाणून घ्या कारण...