ETV Bharat / state

ईडी काय इंटरपोलला आणा आम्ही घाबरत नाही, संजय राऊतांचा भाजपला इशारा - sanjay raut criticism on ED action

'केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असे कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. अटक करायची असेल तर करून टाका, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही' असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिले आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

sanjay raut comented on bjp
संजय राऊतांचा भाजपला इशारा
author img

By

Published : Nov 24, 2020, 1:55 PM IST

मुंबई - 'अटक करायची असेल तर करून टाका, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही' असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिले आहे. ही नामर्दानगी असून थेट समोर येऊन लढा. शिखंडीप्रमाणे कारवाया करू नका. हे उद्योग एक दिवस तुमच्यावरच उलटतील, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शेवट कसा करायचा आम्हाला माहीत आहे

'केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. सीबीआय, ईडी काही असू द्या आम्ही सर्व कुणालाही शरण जाणार नाही. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत, त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. ही काळ्या दगडावरची रेघ की तुमचे सरकार येईल हे स्वप्न विसरून जा. तुम्ही सुरुवात केलीय. शेवट कसा करायचा हे आम्हाला माहीत आहे.' असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांचा भाजपला इशारा

ईडीने राजकीय पक्षासारखे वागू नये

आमच्या आमदारांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटले तरी काहीही होणार नाही. ईडीने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करू नये. ज्या पक्षाच्या आदेशाचे ते पालन करत आहेत त्यांच्या 100 नेत्यांची नावे मी पाठवतो. त्यांचे काय उद्योगधंदे आहेत, निवडणुकीत कुठून पैसे येतात, हे आम्हाला माहीत आहे. अलीकडे कायदा सत्ताधाऱ्यांचा गुलाम बनतोय. ते राबवणारे यांचे नोकर-चाकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. कितीही खोटी कागदपत्रे, पुरावे तयार करा, तरीही अंतिम विजय सत्याचाच होणार आहे. ईडीने भाजपा कार्यालयात एक शाखा उघडली असावी. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. नोटीस कसली पाठवता अटक करून दाखवा, अशा शब्दात राऊत यांनी ईडीवरही निशाणा साधला आहे.

शिखंडी सारखी कारवाई न करता सरळ लढाई करावी

'आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी उपस्थित नाहीत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जो छापा टाकला ही नार्मदानगी आहे. भाजपाने सरळ लढाई करावी. हे शिखंडी सारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका. ईडी काय इंटरपोलला आणा आम्ही घाबरत नाही. तपास करण्याची बंदी नाही. त्यातून पुरावे मिळाले तर कारवाई करू शकतात. पण तुम्हाला विरोधकांना गप्प करण्यासाठी जी नीती अवलंबतात ती तुमच्यावरही उलटू शकते. साम दाम दंड भेद यात आम्हीही डॉक्टरेट केली आहे. आमचा जन्म साम दाम दंड भेदातून झालाय हे विसरू नका,' असेही राऊत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.