ETV Bharat / state

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंचा फोन आल्यानंतर आम्ही गहिवरलो, आता आम्ही लढू-संजय राऊत

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( Money laundering case ) कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) तुरूंगातून बाहेर आले आहेत. संजय राऊत अर्थर रोड कारागृहातून ( Arthur Road Jail ) बाहेर येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Nov 10, 2022, 7:02 AM IST

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( Money laundering case ) कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) तुरूंगातून बाहेर आले आहेत. बुधवारी त्यांचा कोर्टाने जामीन मंजूर केला ( Court granted bail ). कोर्टाने संजय राऊत यांना जामीन जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी टाळ्या वाजवल्या. संजय राऊत अर्थर रोड कारागृहातून ( Arthur Road Jail ) बाहेर येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले व कारागृह ते संजय राऊत यांचे भांडुप येथील घर अशी मोठी रॅली काढली.

भंडूपमध्ये घरी पोचल्यानंतर संजय राऊत यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी एक स्टेजदेखील बांधण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर असे लिहिण्यात आले होते. तर, काही शिवसैनिक DJ च्या तालावर नाचत होते. या प्रसंगी राऊत यांच्या मैत्री या निवासस्थाना बाहेर हजारो शिव सैनिक उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडून स्वागत केले.

संजय राऊत

मला अटक करून त्यांनी सर्वात मोठी चूक केली : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 100 दिवसानंतरही सर्वांनी माझी आठवण ठेवली, त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे. मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आनंदी आहेत. यांना शिवसेना संपवायची होती. त्यांना माहिती होतं मी बाहेर असताना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाहीत. म्हणूनच मला अटक करून घेऊन गेले. मग मी म्हणालो की मला मरायला आवडेल पण मी शरण जाणार नाही. तीन महिन्यात शिवसेना फोडून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना तुटलेली नाही. ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. मशाल पेटवली आहे. मला अटक करून त्यांनी सर्वात मोठी चूक केली आहे, ते आता कळेल.

गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही : आपल्या भाषणात पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझी अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आला. याला अटक केले की आमचे सरकार येईल, त्याला आत टाका. तुम्ही मला कितीही अटक केली तरी मी शिवसेना सोडणार नाही. गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मुंबई ताब्यात घेण्यासाठी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. मला अटक झाल्यावर सगळे रडले. पण आता कोणी रडणार नाही, आता आम्ही लढू. मला 103 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आता 103 आमदार निवडून आणायचे आहेत. त्याची सुरुवात माझ्या अटकेपासून झाली. आता माझी सुटका झाली आहे. आता थांबायची गरज नाही.

उद्धव ठाकरेंचा फोन ते गहिवरले : आपल्या भाषणात संजय राऊत यांनी एक भावनिक प्रसंग देखील सांगितला. ते म्हणाले की, मी जेव्हा तुरुंगातून बाहेर आलो त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते गहिवरले होते. त्यामुळे मला देखील गहिवरून आले. यावरून दिसून येते शिवसेना हा एक परिवार आहे. मी जेव्हा बाहेर आलो त्यावेळी रस्त्याच्या आजूबाजूला हजारो लोक उभे राहून अभिवादन करत होती. ते मला नाही तर या भगव्याला आणि या शिवसेनेला अभिवादन करत होती. अगदी आम्ही जेव्हा मोहम्मद अली रोडवरून जात होतो, त्यावेळी देखील हजारो मुस्लिम बांधव रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शिवसेनेच्या घोषणा देत होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.