ETV Bharat / state

'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडं मारू नयेत'

आज त्यांनी अभिनेते राजकुमार यांच्या टि्वट केलेल्या डायलॉगवर स्पष्टिकरण दिले. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँडच्या पोलिसांशी केली जाते. ते सुशांतसिंग प्रकरणात सक्षम आहेत. गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त याबाबत बोलतील. मला यात बोलण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी सुशांत सिंग प्रकरणावर दिली.

author img

By

Published : Aug 3, 2020, 2:36 PM IST

'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडं मारू नयेत'
'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडं मारू नयेत'

मुंबई - काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, असा नियम आहे. हमाम मे सब नंगे होते है. कोणी कोणाकडे बोट दाखवू नये. राजकारणामध्ये सगळे काचेच्या घरात राहतात. माझा कोणावरती रोख नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिले. आज त्यांनी अभिनेते राजकुमार यांच्या टि्वट केलेल्या डायलॉगवर स्पष्टिकरण दिले. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँडच्या पोलिसांशी केली जाते. ते सुशांतसिंग प्रकरणात सक्षम आहेत. गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त याबाबत बोलतील. मला यात बोलण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी सुशांत सिंग प्रकरणावर दिली.

अयोध्येच्या आसपास कोरोनाचा कहर आहे. मला वाटते तिथे कमीत कमी लोकांनी जावे आणि तो रखडलेला सोहळा पूर्ण करावा हे महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री जात आहेत हे महत्त्वाचे आहे. शिवसेनेचे राम मंदिर उभारणीसाठी नेहमी योगदान राहिले आहे. मंदिर उभारणीचा रस्ता आम्ही तयार केला आहे आणि हे भाजपच्या नेत्यांनीही मान्य केले आहे, असेही यावेळी बोलताना राऊत म्हणाले.

आमच्या योगदानाची इतिहासात नोंद झाली आहे. मुख्यमंत्री तिथे केव्हाही जातील. निमंत्रणासाठी कोणी थांबलेला नाही, परिस्थिती समजून घ्या. याला राजकीय रंग आम्ही देऊ इच्छित नाही, असे स्पष्टीकरणदेखील राऊत यांनी राममंदिर उभारणी सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत दिले. सुशांत सिंगप्रकरणी युवा मंत्र्याचे नाव समोर येत आहे यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपने नाव घेऊन बोलावे. हवेत तीर मारू नयेत.

हा महाराष्ट्र आहे आणि हे मुंबई पोलीस आहेत हे समजून घ्यावे. बिहारमध्ये 5 वर्ष काम झाले नसेल तर विषय समोर आणले जातील. नितीशकुमार यांनी 5 वर्ष चांगली कामे केली असतील, त्यावर ते निवडणूक लढवतील असेदेखील राऊत यांनी आगामी बिहार निवडणुकीवर बोलताना भाष्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.