ETV Bharat / state

Sanjay Raut on Nanded Case : महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना...; 'त्या' प्रकरणावरून राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका - sanjay raut attack on eknath shinde

Sanjay Raut on Nanded Case : महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना, सत्ताधारी मात्र दिल्ली दौऱ्यात व्यस्त आहेत. या सरकारला जनतेची चिंता नाही अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलीय.

Sanjay Raut on Nanded Case
Sanjay Raut on Nanded Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 4:19 PM IST

संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

मुंबई Sanjay Raut on Nanded Case : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू असतांनाच आता नागपूरात देखील अशीच घटना घडल्याचं समोर आलंय. तसंच यापुर्वी ठाण्यातील कळवा इथंही अशीच घटना घडली होती. यावरून आता राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलीय.

काय म्हणाले संजय राऊत : यासंदर्भात मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना, या राज्य सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना जनतेची चिंता नाही. हे फक्त राजकारणात अडकलेत. कोणाला पालकमंत्री, कोणाला खाते बदलून देणे अशातच ते अडकलेत. राज्यातील संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेलीयं. राज्यात मृत्यूचं तांडव सुरू असून राज्य सरकारला त्याची कोणतीही काळजी नाहीय. अतिशय निर्घृण आणि निर्दयी सरकार या महाराष्ट्राच्या वाट्याला आलंय. नांदेड आणि नागपूरला जाऊन मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पहा. या सरकारला खुनी म्हणायचं नाही तर काय यांचा सत्कार करायचा का?" असा संतप्त सवालही संजय राऊतांनी केलाय.

2024 ला सर्वांचा हिशोब होणार : दिल्लीत केंद्रीय तपास यंत्रणांनी चीन कडून फंडिंग घेतल्याच्या आरोपाखाली काही पत्रकारांना अटक केली असून, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाविषयी विचारण्यात आलं असता राऊत म्हणाले की, "आठ नऊ पत्रकारांवर कारवाई करण्यात आलीय. चीनकडून फंडिंग मिळते अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. हे हस्यास्पद आहे. बेडरपणे हे पत्रकार सरकारला प्रश्न विचारण्याचं काम करतात. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आपल्या सीमेवर चीन हस्तक्षेप करत आहे. त्याबाबत तुम्हाला राग येत नाही. पत्रकारांवर धाडी घालत आहात ते चुकीच आहे. आणीबाणीचा तुम्ही प्रत्येक वर्षी श्राद्ध घालता. पण, आणीबाणीच्या काळात देखील असं झालं नव्हतं. ईडीच्या धाडी संजय सिंग यांच्यावर देखील पडल्या. आम्ही देखील त्यांच्यातून होरपळून बाहेर पडलो आहोत. यंत्रणाच फास आवळत आहेत. अटक करताना कुठलंही कारण देत नाही. ईडीची लोकं अंडरवर्ल्ड डॉन सारखे येतात, घुसतात आणि अटक करतात. 2024 ला सर्वांचा हिशोब होणार," असा इशाराही यावेळी राऊतांनी दिलाय.

फोन टॅपिंग प्रकरणीही दिली प्रतिक्रिया : कथित फोन टॅपिंग प्रकरणातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक झाल्या आहेत. राज्य सरकारकडून त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलीय. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "अगदी सर्वोच्च न्यायालयापासून पोलीस आर्मी पर्यंत देशभरात आरएसएस आणि संघ परिवार यांच्या माणसांना कोणत्या पदावरती बसवेल सांगता येत नाही."

हेही वाचा :

  1. Sanjay Raut On Rahul Narvekar : राज्यात लोकशाहीचा खून, 'ते' मात्र लोकशाही मजबुतीसाठी विदेशात; संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. Narayan Rane Targets Uddhav Thackeray : संजय राऊत मातोश्रीत पगारदार नोकर, उद्धव ठाकरेंना काही कळत नाही; नारायण राणेंचा प्रहार
  3. Sanjay Raut On Pm Modi : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.