मुंबई- एकीकडे अजित पवारांसोबत भाजपला पाठिंबा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादीचे आमदार २४ तास पूर्ण होण्यापूर्वीच शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगत परतले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुन्हा शिवसेनेला संपर्क केला जात आहे. असे होत असल्याच्या वृत्ताला आज 'द ललित' येथे वास्तव्यास असलेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत खुद्द शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुजोरा दिल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
यापूर्वीही संघाकडून सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी शिवसेनेला संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच संघाने जरी पुन्हा प्रयत्न केला असला तरी खूप उशीर झाला असल्याचे उध्दव ठाकरेंनी आमदारांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत शिवसेना आमदारांना सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल माहिती सांगितली. आता शरद पवार आपल्यासोबत ठाम उभे आहेत त्यामुळे चिंता करायची गरज नाही, असा दिलासा देत सत्ता आपलीच येणार, असा विश्वास देखील उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. आपण तिनही पक्ष एकत्र मिळून लढत आहोत, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
हही वाचा- भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट