ETV Bharat / state

नितेश राणेंनी जे केलं ते योग्यच.. मनसेच्या संदीप देशपांडेंचा राणेंना पाठिंबा - enginer

नितेश राणेंनी जे केलं ते योग्यच केले. त्यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.

संदीप देशपांडेंचा नितेश राणेंना पाठिंबा
author img

By

Published : Jul 6, 2019, 2:09 PM IST

मुंबई - नितेश राणेंनी जे केलं ते योग्यच केले. त्यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आमदार नितेश राणेंनी उपाअभियंत्यांवर चिखलफेक केली होती. याप्रकरणी संदीप देशपांडेंनी राणेंना पाठिंबा दिला आहे.

नितेश राणेंवर सक्षमपणे कारवाई करणारे सरकार, ज्या इंजिनियर्समुळे हजारो लोकांचे बळी गेले. ज्या लोकांचे हातपाय गेले त्यांच्यावर सरकार कधी कारवाई करणार? असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी यावेळी केला. लाखो रुपये पगार घेऊन जर अधिकारी योग्य प्रकारे काम करणार नसतील तर लोकप्रतिनिधींनी जाब कोणाला विचारायचा असेही देशपांडे म्हणाले.

नितेश राणेंनी जे केलं ते योग्यच - संदीप देशपांडे

अधिकाऱ्यांना चांगली भाषा समजत नसेल तर त्यांना योग्य भाषेत सांगावे लागेल असेही देशपांडे म्हणाले. त्यामुळे नितेश राणेंनी केले ते योग्यच केले असे म्हणत देशपांडेंनी नितेश राणेंचे समर्थन केले. सरकारने नितेश राणेंची लवकरात लवकर सुटका करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली होती.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.