मुंबई - महाशिवरात्री निमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरांबाहेर दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - भीमाशंकरचे महाशिवरात्रीला वेगळे महत्व
महाशिवरात्रीचे महत्व हिंदू धर्मात विशेष आहे. पश्चिम उपनगरातील समुद्र किनाऱ्यावरील जुहू चौपाटीवरील महादेवाचे वाळू शिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वाळू शिल्पकार लक्ष्मी गौडा यांनी शिवलिंग, हिमालयात महादेव ध्यान धारणा करत असल्याचे वाळू शिल्प साकारले आहे. अवघ्या 24 तासांत त्यांनी या शिल्पाची कलाकृती साकारली आहे.