मुंबई - समीर वानखेडे निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र, माझा नवरा (समीर वानखेडे) आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या आताही आणि तेव्हाही हिंदू होते, असा दावा त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केला.
त्या म्हणाल्या, समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचे लग्न झाले. त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना खुर्चीवरून हटवण्याची जाहीर घोषणा केली होती. ही पूर्ण गुंडगिरी आहे. समीर वानखेडे यांनी या खुर्चीवर राहू नये, अशी त्यांची इच्छा आहे.
नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्या वडिलांनी समोर येऊन याबाबत प्रतिक्रिया दिली. मी जन्मजात हिंदू असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. माझे पणजोबा सर्व दलित हिंदू होते. मग माझा मुलगा कुठे मुस्लिम झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नवाब मलिक यांनी काहीही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा, असे त्यांनी समीर वानखेडेंच्या वडिलांनी म्हटले आहे.
हेही वाचा - समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट
समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा
2006 मध्ये लग्नादरम्यान समीर वानखेडे याने स्वत:ला मुस्लिम असल्याचे सांगितले होते. २००६ साली समीर वानखेडे ह्यांचा शबाना ह्यांचाशी निकाह झाला. निकाहच्यावेळी समीर आणि शबाना दोघेही मुस्लीम धर्मीय होते. जर समीर वानखेडे मुस्लिम नसते तर मी निकाह पढवला नसता, असा दावा मौलाना अहमद यांनी केला.
समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक हे अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक आरोप करत आहेत. यातच त्यांनी आज पुन्हा एकदा नवीन ट्विट करत या आरोपांमध्ये भर टाकली. नवाब मलिक यांनी आज नवीन ट्विट करत समीर वानखडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. यासोबतच समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचा निकाहनामा असल्याचाही त्यांनी ट्विट करत दावा केला आहे. या निकाहनामा मध्ये समीर दाऊद वानखडे अशा नावाचा उल्लेख आहे. हे लग्न 6 डिसेंबर 2008 साली झाला असल्याचंही नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितला आहे.