ETV Bharat / state

Bhide on Mahatma Gandhi Controversy statement : आंबा, टिकली ते गांधी, फुले- संभाजी भिडेंनी अनेकवेळा केली आहेत वादग्रस्त विधाने - टिकलीवर संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने ते आता वादात अडकले आहेत. हा वाद अगदी ताजाच असताना संभाजी भिडे यांनी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, राजा राममोहन रॉय यांच्यासह लाखो भक्तांचे श्रद्दास्थान असलेल्या साईबाबांबद्दलही आक्षेपार्ह विधाने करत नवा वाद ओढवून घेतला आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे
author img

By

Published : Jul 31, 2023, 1:28 PM IST

मुंबई: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आणि वाद हे समीकरण झाले आहे. भिडेंनी काही विधान करावे आणि ते वादात अडकू नये, असे क्वचितच घडले असेल. भिडेंनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली असून ते अनेकदा टीकेचे धनी बनले आहेत. आता दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. हा वाद शमण्याआधीच महात्मा ज्योतिबा फुले, राजा राममोहन रॉय आणि साईबाबांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे भिडे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यापूर्वीही संभाजी भिडेंनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. भिडे यांनी आतापर्यंत केलेली वादग्रस्त विधाने कोणती, याबद्दल आम्ही सांगणार आहोत.

आधी टिकली लाव: 2022 मध्ये एका महिला पत्रकार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्यांनी तू आधी टिकली लाव, मग तुझ्याशी बोलेन, असे म्हणत त्यांनी त्या पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. भिडेंच्या या विधानाने महिलेचा अपमान असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान: आपल्या देशाच्या स्वाभिमानाची चर्चा आपण सर्वत्र करत असतो. ज्या देशाचा गाजावाजा अख्या जगात होत आहे. त्याच भारत देशाला संभाजी भिडेंनी 'निर्लज्ज लोकांचा देश' म्हटले होते. परकीयांचे खरकटं आणि उष्ट खाणारे. स्वाभिमानाची शून्य जाणीव असलेला निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान. भारतातील लोकांना गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा विषमपणा वाटत नाही. लाजही वाटत नाही. अशा बेशरम लोकांचा भारत देश आहे, असे भिडे म्हणाले होते.

स्वातंत्र्यदिनाबाबत वादग्रस्त विधान: देशाच्या स्वातंत्र्याविषयीही भिडेंनी वादग्रस्त विधान केले आहे. 15 ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही. उलट यादिवशी भारताची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा, असे भिडेंनी म्हटले होते.

गां* वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग: 'कोरोना' या रोगाने जगभरात थैमान घातले होते. या रोगाने लाखो नागरिकांचा जीव घेतला होता. त्यावेळीही संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोनामुळे जे माणसे मरतात, ते जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडायला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकत आहे त्याला पोलीस काठ्या मारत आहे. काय चावटपणा चालू आहे? हा सर्व प्रकार महानालायकपणाचा आहे. तसेच कोरोना हा रोगच नाही. हा गां*** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग असल्याचे भिडे म्हणाले होते.

डॉक्टर नालायक, लुटारू : 'कोरोना' काळात दिवसरात्र कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांविषयीही संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधान केले होते. कोरोना काळात लोकांचा मृत्यू भीतीने झाला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्या या विधानामुळे डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या.

आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली: फक्त देशच नाही तर भिडेंनी मुलांविषयीही वादग्रस्त विधान केले आहे. लग्न होऊन आठ-आठ, दहा-दहा वर्ष झालेल्यांना पोर होत नाहीत, अशा स्त्री-पुरुषांनी आंबा खाल्ला तर त्यांना नक्कीच मुलं होतील. माझ्याकडे असे एक झाड आहे त्याचे आंबे खाल्ल्याने मुले होतात. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना हे आंबे खायला दिले आहेत. पथ्य सांगितले आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुले झाले. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. असा आंबा माझ्याकडे असल्याचे भिडे म्हणाले होते.

पंडित जवाहरलाल नेहरुंबद्दल वादग्रस्त विधान: अमरावतीमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर भिडेंनी पंडित नेहरुंवर टीका केली. यवतमाळ येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर बोलणे टाळले पण पंडित नेहरुंवर टीका केली. अखंड हिंदुस्थानासाठी पंडित नेहरु यांचे नखाएवढेही योगदान नसल्याचे टीका त्यांनी केली.

महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान: महात्मा गांधी यांचे वडील हे मुस्लीम जमीनदार असल्याचे विधान संभाजी भिडेंनी अमरावती येथील एका सभेत केले. यावरुन काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. तर अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहमी वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडेंना अटक करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

हेही वाचा-

  1. Prithviraj Chavan : राजकीय टीका करा, मात्र समाजविघातक वक्तव्य खपवून घेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा थेट इशारा
  2. Vijay Wadettiwar : तरुणांच्या मनात विष पेरण्याचे काम संभाजी भिडे करतायेत - विजय वडेट्टीवार
  3. Sambhaji Bhide fell from Bicycle : संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरून पडले; रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.