ETV Bharat / state

'बोलायचे एक आणि करायचे एक यामुळेच भाजप विरोधी बाकावर'

बोलायचे एक आणि करायचे एक ही भाजपची प्रवृत्ती असल्यामुळेच, १०५ जागा असूनही त्यांच्यावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नसल्याचे वक्तव्य शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केले आहे. तसेच २०१४ सालीच भाजपचे ढोंग बाहेर आले होते.

samana editorial comment on BJP for prithviraj chavan statement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 22, 2020, 8:30 AM IST

Updated : Jan 22, 2020, 9:00 AM IST

मुंबई - बोलायचे एक आणि करायचे एक, ही भाजपची प्रवृत्ती असल्यामुळेच, १०५ जागा असूनही त्यांच्यावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नसल्याचे वक्तव्य शिवसेनेने मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून केले आहे. तसेच २०१४ सालीच भाजपचे ढोंग बाहेर आले होते. कारण भाजपने २५ वर्षांची युती अत्यंत निर्घृण पद्धतीने तोडल्याचे सेनेने म्हटले आहे.

शिवसेनेच्या खऱ्या चेहऱ्यावर भाजपचे संशोधन
२०१४ साली शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर भाजपने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खननच. मात्र, चव्हाण यांच्या दाव्याने फारशी खळबळ होण्याचे कारण नाही. कारण चव्हाण यांचा दावा मुंबईच्या सौम्य हवेत वाहून गेल्याचे सेनेने म्हटले आहे. चव्हाण यांचे वक्तव्य शिवसेना किंवा राष्ट्रवादीने गांभीर्याने घेतली नसले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते गांभीर्याने घेतले आहे.

चव्हाणांच्या सांगण्यात 'लॉजिक' नाही
पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यात लॉजिक नावाचा प्रकार नसल्याचे सेनेने म्हटले आहे. कारण २०१४ साली भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. या चौरंगी लढतीत भाजप १२२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेन ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे २०१४ ला त्रिशंकू परिस्थिती होती. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली तरी आकडा १४९ च्या आसपास होता. हा धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते. घोडेबाजार करायला मशहूर असलेल्या भाजपने तेव्हाही तोडफोड केली असती असे सेनेने म्हटले आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या म्हणण्यात लॉजिक नावाचा प्रकार नसल्याचे सेनेने म्हटले आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसला आवाज नव्हता, त्यामुळे काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सेनेने म्हटले आहे.

भाजपने स्वत: चा चेहरा आरशात पाहावा
२०१४ साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला होता. त्यामागे गुरुमहाराजांची (शरद पवार) इच्छा होती. त्यामुळे शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखाडे मारण्यापेक्षा भाजपने स्वत:चा खरा चेहरा आरशात पाहावा असे सेनेने म्हटले आहे. २०१४ ला जी शिवसेना होती तिच शिवसेना आजही असल्याचे सेनेने म्हटले आहे.

Intro:Body:

बोलायचे एक आणि करायचे एक यामुळे भाजप विरोधी बाकावर - शिवसेना

मुंबई -   बोलायचे एक आणि करायचे एक ही भाजपची प्रवृत्ती असल्यामुळेच, १०५ जागा असूनही त्यांच्यावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नसल्याचे वक्तव्य शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केले आहे. तसेच २०१४ सालीच भाजपचे ढोंग बाहेर आले होते. कारण भाजपने २५ वर्षाची युती अत्यंत निर्घृण पद्धतीने तोडल्याचे सेनेने म्हटले आहे.

शिवसेनेच्या खऱ्या चेहऱ्यावर भाजपचे संशोधन 

२०१४ साली शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. असे वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर भाजपने संशोधन सुरु केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खननच. मात्र, चव्हाण यांच्या दाव्यावे फारशी खळबळ होण्याचे कारण नाही. कारण चव्हाण यांचा दावा मुंबईच्या सौम्य हवेत वाहून गेल्याचे सेनेने म्हटले आहे. चव्हाण यांचे वक्तव्य शिवसेना किंवा राष्ट्रवादीने गांभीर्याने घेतली नसले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते गांभीर्याने घेतले आहे.

चव्हाणांच्या सांगण्यात 'लॉजिक' नाही

पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यात लाजिक नावाचा प्रकार नसल्याचे सेनेने म्हटले आहे. कारण २०१४ साली भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. या चौरंगी लढतीत भाजप १२२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष टरला होता. शिवसेनेन ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे २०१४ ला त्रिशंकू परिस्थिती होती. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली तरी आकडा १४९ च्या आसपास होता. हा धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते. घोडेबाजार करायला मशहूर असलेल्या भाजपने तेव्हाही तोडफोड केली असती असे सेनेने म्हटले आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या म्हणण्यात लॉजिक नावाचा प्रकार नसल्याचे सेनेने म्हटले आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसला आवाज नव्हता, त्यामुळे काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सेनेने म्हटले आहे.  

 भाजपने स्वत: चा चेहरा आरशात पाहावा

२०१४ साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला होता. त्यामागे गुरुमहाराजांची (शरद पवार) इच्छा

होती. त्यामुळे शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखाडे मारण्यापेक्षा भाजपने स्वत:चा खरा चेहरा आरशात पाहावा असे सेनेने म्हटले आहे. २०१४ ला जी शिवसेना होती तिच शिवसेना आजही असल्याचे सेनेने म्हटले आहे. 

Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 9:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.