ETV Bharat / state

सलून कर्मचाऱ्यांना सहायता निधी द्यावी, नाभिक समाजाची मागणी

बिकट परिस्थितीत सलूनमध्ये काम करणाऱ्या नाभिक वर्गाला उदरनिर्वाहासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत द्यावी. नाभिकांच्या खात्यात केंद्र सरकारने २ हजार रुपये सहायता निधी जमा करावे, अशी मागणी नाभिक संघटनेने केली आहे.

salon workers mumbai
सलून
author img

By

Published : Apr 13, 2020, 10:05 AM IST

मुंबई- कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका हातावर पोट असलेल्या नाभिक समाजावरही झाला आहे. राज्यातील ७० टक्के नाभिक हे कर्ज काढून भाड्याच्या दुकानात व्यवसाय करतात. त्यामुळे, केंद्र सरकारने आणि अर्थमंत्रालयाने आमच्यासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी नाभिक समाज संघटनेने केली आहे.

माहिता देताना राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे

नाभिकांना तात्काळ २ ते ५ हजार रुपयांची मदत सरकारने करावी, अशी इच्छा राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे यांनी केली आहे. तसे पत्र संघटनेच्या वतीने केंद्र सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात आले आहे. २६ मार्च रोजी केंद्रीय मंत्र्यांनी कामगारांच्या खात्यात २ हजार रुपये सहायता निधी जमा होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ही रक्कम आजपर्यंत जमा करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ-महाराष्ट्र राज्य संगठन सलूनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आधारसह सर्व माहिती शासन सांगेल तेथे जमा करेल. त्यामुळे, या बिकट परिस्थितीत सलूनध्ये काम करणाऱ्या नाभिक वर्गाला उदरनिर्वाहासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत द्यावी. नाभिकांच्या खात्यात केंद्र सरकारने २ हजार रुपये सहायता निधी जमा करावे, अशी मागणी नाभिक संघटनेने केली आहे.

हेही वाचा- प्रशासन बेस्ट कामगारांच्या जीवाशी खेळत आहे, कामगार नेते शशांक राव यांचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.