ETV Bharat / state

नायर रुग्णालयात 306 कोरोनाबाधित मातांची सुखरुप प्रसूती; 10 बाळांची कोरोनावर मात - नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांची प्रसूती

एकाच रुग्णालयात 306 कोरोनाबाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे. नायर रुग्णालयातच 10 बाळांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिका आणि रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय एप्रिल महिन्यात 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झाले.

delivery of corona positive mother
नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांची प्रसूती
author img

By

Published : Jun 14, 2020, 10:21 PM IST

मुंबई - महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात कोरोनाबाधित गरोदर महिलांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. या विशेष कक्षात प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशू व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभाग या तीन विभागांच्या सुयोग्य समन्वयातून 306 गरोदर महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. रुग्णालयात आतापर्यंत 63 टक्के 'नॉर्मल डिलिव्हरी', तर 37 टक्के 'सिझेरियन'द्वारे प्रसूती झाली आहे.

एकाच रुग्णालयात 306 कोरोनाबाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे. नायर रुग्णालयातच 10 बाळांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिका आणि रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय एप्रिल महिन्यात 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झाले. रुग्णालयात 14 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली.

सिजेरियन डिलीवरी प्रकारातील प्रसूती सुखरूपपणे होण्यात नायर रुग्णालयातील भूलशास्त्र विभागाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. प्रसूती झालेल्या 306 मातांपैकी 254 मातांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

10 बाळांची कोरोनावर मात -

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या 306 बाळांपैकी 10 नवजात बाळांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

काटेकोर दक्षता -

नवजात शिशुंच्या योग्य पोषणासाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, आई मुलाला स्तनपान देत असताना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन नियमितपणे केले जात आहे. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक मातेला सॅनिटायझर, साबण, तोंडाला बांधायचा 'मास्क' इत्यादी नियमितपणे दिले जात आहे. त्याचबरोबर आईचा आहारदेखील अधिकाधिक प्रथिनयुक्त व पोषणयुक्त असावा यासाठी नियमितपणे पोषक नाश्ता व जेवण दिले जात आहे. यामध्ये कडधान्य, डाळी, अंडी यासारख्या बाबींचा समावेश आहे. :

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.