ETV Bharat / state

सदाभाऊ खोतांची महायुतीकडे 12 जागांची मागणी; 'हे' आहेत मतदारसंघ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणतीही अट न घालता महायुतीला पाठिंबा दिला आणि सर्व प्रकारचे सहकार्य केले. आता विधानसभेच्या आम्हाला १२ जागा हव्या आहेत. यासाठीची मागणी आपण महायुतीकडे केली असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
author img

By

Published : Sep 13, 2019, 8:05 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणतीही अट न घालता महायुतीला पाठिंबा दिला आणि सर्व प्रकारचे सहकार्य केले. आता विधानसभेच्या आम्हाला १२ जागा हव्या आहेत. यासाठीची मागणी आपण महायुतीकडे केली असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

सदाभाऊ खोत यांच्याशी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बातचीत

हेही वाचा - शिवसेनेची यादी आपणच तयार करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा १९ तारखेला संपत आहे. यात्रेनंतर आमची जागावाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यात १२ जागा देण्याचा निर्णय होईल अशी अपेक्षा खोत यांनी व्यक्त केली आहे. मी ज्या जागा मागीतल्या आहेत त्यात इस्लामपूर, कराड उत्तर, धुळे जिल्ह्यातील साक्री, नगर मधील श्रीरामपूर, नांदेड जिल्ह्यातील माळेगाव व भोकर, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व मंगळवेढा अशा एकूण बारा जागा महायुतीला मागीतल्या असल्याचे खोत म्हणाले.

हेही वाचा - राष्ट्रवादीला रामराम..! अखेर भास्कर जाधवांनी दिला आमदारकीचा राजीनामा

खोत म्हणाले, लोकसभेची निवडणूक आम्ही एकत्र लढलो. आता विधानसभेची निवडणूकही एकसंधपणे लढणार आहोत यात कसलाही वाद नाही. तसेच माझा चिरंजीव सागर खोत यालाही विधानसभेत उभे करण्यासाठी कार्यकर्ते बोलत आहेत. मात्र, त्याला राजकारण शिकण्यासाठी बराच काळ आहे. मी स्वतः तीस वर्ष चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले आणि त्यानंतर माझा राजकीय पटलावर उदय झाला. यामुळे माझ्या मुलाने अजून काही काळ तरी सामान्य जनतेचे प्रश्‍न घेऊन ते सोडवत राहावे असे मला वाटते. राजकारणाच्या पटलावर हा खरे तर काटेरी मुकुट आहे त्यामुळे इथे येण्यापूर्वी सर्व डाव समजून घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा - सभापतीपद टिकवण्यासाठी रामराजेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; शिवबंधनात अडकणार

या पाच वर्षांच्या काळामध्ये आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आमूलाग्र बदल होईल, असे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणीही केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळेल यासाठीही प्रयत्न करण्यात आले. शेतमालाचे भाव पडल्यानंतर ते खरेदी करण्याची करणे असो अथवा शेतकऱ्यांना पीक विमा, पिक कर्ज आणि त्यांच्या कर्जमाफीचा विषय सरकारने सोडवला असल्याने आम्ही असे सर्व प्रश्न घेऊन विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर जाणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.

Intro:विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना हव्यात १२ जागा; महायुतीत करणार मागणी

mh-mum-rayatkranti-sadabhau-khot-121-721153

मुंबई, ता. १३:

लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणतीही अट न घालता महायुतीला पाठिंबा दिला आणि सर्व प्रकारचे सहकार्य केले. आता विधानसभेत आम्हाला एकूण 12 जागा हव्या आहेत यासाठीची मागणी आपण महायुतीत केली असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ईटीवी भारत' शी बोलताना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा १९ तारखेला संपत आहे. या यात्रेनंतर आमची जागावाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यात १२ जागा देण्याचा निर्णय होईल अशी अपेक्षा खोत यांनी व्यक्त केली. मी ज्या जागा मागितल्या आहेत त्यात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर, धुळे जिल्ह्यातील साक्री, नगर मधील श्रीरामपूर, नांदेड जिल्ह्यातील माळेगाव तसेच भोकर आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि चिखली तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि मंगळवेढा अशा एकूण बारा जागा मी महायुतीत मागितल्या असल्याचे खोत म्हणाले.
लोकसभेची निवडणूक आणि ही निवडणूक आम्ही एकसंधपणे लढणार आहोत त्यात कसलाही वाद नाही मागितले आहेत. परंतु जेवढे आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र बसून त्यावेळी माझ्या रागाचा विषय अत्यंत समंजस पणाने निकाल लागलेला दिसून येईल असे मला वाटते. तसेच माझे चिरंजीव सागर खोत यांना विधानसभेत उभे करण्यासाठी कार्यकर्ते बोलत आहेत, मात्र त्याला राजकारण शिकण्यासाठी बराच काळ आहे. मी स्वतः तीस वर्ष चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले आणि त्यानंतर माझा राजकीय पटलावर उदय झाला. यामुळे माझ्या मुलाने अजून काही काळ तरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न घेऊन ते सोडवत राहावं असे मला वाटते. राजकारणाच्या पटलावर हा खरे तर काटेरी मुकुट आहे त्यामुळे इथे येण्यापूर्वी सर्व डाव समजून घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

या पाच वर्षांच्या काळामध्ये आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आमूलाग्र बदल होईल, असे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणीही केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्यात आले.तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळेल यासाठीही प्रयत्न करण्यात आले. शेतमालाचे भाव पडल्यानंतर ते खरेदी करण्याची करणे असो अथवा शेतकऱ्यांना पीक विमा, पिक कर्ज आणि त्यांच्या कर्जमाफीचा विषयी सरकारने सोडवला असल्याने आम्ही असे सर्व प्रश्न घेऊन विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर जाणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले

Body:विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना हव्यात १२ जागा; महायुतीत करणार मागणीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.