मुंबई - एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही काही कारखाने तुकड्या तुकड्याने पैसे देता. ज्या कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे, त्यांनी लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी सभागृहात आज रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली. ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे नेते आता सत्तेसोबत असल्याचे म्हणत त्यांनी राजू शेट्टींना टोला लगावला.
गुजरातमध्ये ऊसाला ४ हजार रुपयाचा दर दिला जातो. त्याप्रमाणे महराष्ट्राततसुद्धा हा पॅटर्न राबवणार का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. साखर आयुक्ताने वसुलीचे काम सुरू केले आहे. 109 कारखान्यांकडे 1 हजार 557 कोटी रुपये थकीत होते. यात 1 हजार 305 कोटी वसूल केले आहेत. आता थकीत रक्कम एकूण 233 कोटी रुपये आहे.
काही कारखान्यांनी अद्यापही मागील वर्षाची थकबाकी दिलेली नाही. कारखाने सुरु होऊन महिना झाला, पैसे 14 दिवसाच्या आत मिळाले पाहिजे हा नियम आहे. पण ते दिले नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिले तर कर्जाची रक्कम कापली जाईल, आणि त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही, त्यामुळे पैसे दिले नसल्याचेही काही कारखानदार सांगत असल्याचे खोत म्हणाले.