ETV Bharat / state

'लाथ मारेल तिथे..., मंत्रिमंडळ विस्तारांनतर रोहित पवारांची फेसबूक पोस्ट... - रोहित पवारांना मंत्रीमंडळात स्थान नाही

रखडलेला ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये अनेक युवकांनी संधी देण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवारांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट लिहीत 'लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवून काम केल्याचे' म्हटले आहे.

Rohit pawar write facebook post
मंत्रिमंडळ विस्तारांनतर रोहित पवारांची फेसबूक पोस्ट
author img

By

Published : Dec 30, 2019, 9:06 PM IST

मुंबई - रखडलेला ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये अनेक युवकांनी संधी देण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवारांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट लिहित 'लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवून काम केल्याचे' म्हटले आहे. असेच काम यापुढेही करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रत्येकास माझा मंत्रिमंडळात समावेश व्हावा असे वाटत होते. त्या सर्वांचेही रोहित पवार यांनी आभार मानले. मात्र, त्यांच्या या पोस्टमधून मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने रोहित पवार काहीशे नाराज असल्याचे दिसून आले.

रोहित पवार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आदित्य ठाकरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. तर रोहित पवार यांना राष्ट्रवादीने मंत्रीमंडळात स्थान दिले नाही. रोहित पवार यांनी भाजपचे वजनदार असलेले माजी कॅबीनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे या मतदारसंघाची राज्यभर चर्चा झाली होती. राष्ट्रवादीला मिळालेला हा मोठा विजय मानला जात होता. त्यामुळे रोहित पवार यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी आशा होती.

नेमके काय म्हणाले रोहित पवार

आपण ज्यांना आदरार्थी मानतो अशा ज्येष्ठांनी दिलेला सल्ला नेहमीच अंतिम असेल, असे रोहित पवार म्हणाले. लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवूनच मी आजवर काम केले आहे. इथून पुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच दुप्पट वेगाने कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले.

मिळालेल्या संधीचं सोनं करणार

आजवर मला मिळालेल्या प्रत्येक संधीच सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत रहात आपला विश्वास कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. सर्व खात्यांच्या मंत्र्यांसोबत सहकार्याची भावना ठेवून मतदारसंघासोबतच एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत राहणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. सर्व खात्यांच्या मंत्र्यांसोबत सहकार्याची भावना ठेवून तसेच राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत राहील. तसेच ज्यांचा ज्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला त्यांचेही रोहित पवार यांनी अभिनंदन केले.

Intro:Body:

'लाथ मारेल तिथे..., मंत्रीमंडळ विस्तारांनतर रोहित पवारांची फेसबूक पोस्ट...

मुंबई -  रखडलेला ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये अनेक युवकांनी संधी देण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवारांना या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट लिहीत 'लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवून काम केल्याचे' म्हटले आहे. असेच काम यापुढेही करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रत्येकास माझा मंत्रीमंडळात समावेश व्हावा असे वाटत होते. त्या सर्वांचेही रोहित पवार यांनी आभार मानले. मात्र, त्यांच्या या पोस्टमधून मंत्रीमंडळात वर्णी न लागल्याने रोहित पवार काहीशे नाराज असल्याचे दिसून आले.

रोहित पवार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आदित्य ठाकरे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली. तर रोहित पवार यांना राष्ट्रवादीने मंत्रीमंडळात स्थान दिले नाही. रोहित पवार यांनी भाजपचे वजनदार असलेले माजी कॅबीनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे या मतदारसंघाची राज्यभर चर्चा झाली होती. राष्ट्रवादीला मिळालेला हा मोठा विजय मानला जात होता. त्यामुळे रोहित पवार यांना मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी आशा होती.

नेमके काय म्हणाले रोहित पवार

आपण ज्यांना आदरार्थी मानतो अशा जेष्ठांनी दिलेला सल्ला नेहमीच अंतीम असेल असे रोहित पवार म्हणाले. लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवूनच मी आजवर काम केले आहे. इथून पुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच दुप्पट वेगाने कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले.

मिळालेल्या संधीचं सोन करणार

आजवर मला मिळालेल्या प्रत्येक संधीच सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत रहात आपला विश्वास कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. सर्व खात्यांच्या मंत्र्यांसोबत सहकार्याची भावना ठेवून मतदारसंघासोबतच एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत राहणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. सर्व खात्यांच्या मंत्र्यांसोबत सहकार्याची भावना ठेवून तसेच राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत राहील. तसेच ज्यांचा ज्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला त्यांचेही रोहित पवार यांनी अभिनंदन  केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.