ETV Bharat / state

मुंबईत स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याखाली लुटणारी टोळी सक्रिय; दोघांना अटक - सोने विकण्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी मुंबई

तक्रारदार व्यापाऱ्याला सोन्याची बिस्किटे 2 लाख 50 हजारांना विकण्याच्या बहाण्याखाली मुंबईतील बोरिवली परिसरात बोलविण्यात आले होते. व्यापाऱ्याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडून पैसे घेऊन पळ काढला.

स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याखाली लुटणारी टोळी सक्रिय
author img

By

Published : Nov 16, 2019, 5:36 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून स्वस्तात सोन्याची बिस्किटे विकण्याच्या बहाण्याखाली लुटणाऱ्या टोळीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 30 हजाराहून अधिक महाग असलेले 10 ग्राम सोन्याचे बिस्किट केवळ 20 हजारात विकायची आहेत, असे सांगत या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. मुंबई , ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध भागात या टोळ्या सक्रिय आहेत.

स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याखाली लुटणारी टोळी सक्रिय

हेही वाचा- पालघरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकणी १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

अशाच एका प्रकरणात पीडित तक्रारदार व्यापाऱ्याला सोन्याची बिस्किटे 2 लाख 50 हजारांना विकण्याच्या बहाण्याखाली मुंबईतील बोरिवली परिसरात बोलविण्यात आले होते. व्यापाऱ्याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडून पैसे घेऊन पळ काढला. आपल्याला फसवल्याचे लक्षात आल्यावर पीडित व्यापाऱ्याने या संदर्भात गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या संदर्भात तपास करीत आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी काही नकली सोन्याची बिस्किटे सुद्धा हस्तगत केली आहेत.

Intro:गेल्या काही दिवसांपासून मुंबई , ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध भागात स्वस्तात सोन्याची बिस्किटे विकण्याच्या बहाण्याखाली लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. 30 हजाराहून अधिक महाग असलेले 10 ग्राम सोन्याची बिस्किटे केवळ 20 हजारात विकायची असल्याचे सांगत या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

अशाच एका प्रकरणात पीडित तक्रारदार व्यापाऱ्याला सोन्याची बिस्किटे 250000 रुपयांना विकण्याच्या बहाण्याखाली मुंबईतील बोरिवली परिसरात बोलविण्यात आले होते. आरोपीना पीडित तक्रादाराला भेटून त्याला बोलण्यात गुंतवत त्याच्याकडिल अडीच लाखांची रक्कम घेत गाडीतील सोन आणण्याच सांगत पळ काढला.। या आरोपीच्या इतर सहकाऱ्यांनी पोलिसांची धाड पडली असून पळून जाण्याचे सांगत असत. मात्र काही वेळानंतर हा सगळा बनाव असून आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर पीडित व्यापाऱ्याने या संदर्भात गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.Body:पोलिसांनी या संदर्भात तपास करीत आतापर्यंत 2 आरोपीना अटक केली असून या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी काही नकली सोन्याची बिस्किटे सुद्धा हस्तगत केली आहेत.

बाईट- .अकबर पठाण (डीसीपी गुन्हे शाखा )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.