मुंबई - भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. तसेच, त्याच्या तब्येतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. (Rishabh Pant's knee surgery successful) अशी माहिती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने दिली आहे. (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) सूत्रांनी, देलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रिया शुक्रवार (दि. ६ जानेवारी)रोजी झाली. पंत आता वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तसेच, तो आता वेगाने बरा होत आहे. मंगळवारी सायंकाळी ऋषभ पंत याला मुंबईतील अंधेरी येथे कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल ( Kokilaben Dhirubhai Ambani Hospital ) येथे एअरलिफ्ट करून आणण्यात आले होते.
कार अपघातात गंभीर जखमी - ऋषभ पंत यांच्या गुडघ्यावर लिंगामेट सर्जरी करण्यासाठी त्याला रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ दिनशॉ पारधीवाला यांच्या देखरेखीखाली रिषभ पंत याच्यावर उपचार सुरू होते. देहरादून येथे कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला आधी देहराच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
लिंगामेट सर्जरी सर्जरी - मात्र, ऋषभ पंत यांच्या गुडघ्यावर झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी त्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या हॉस्पिटलमध्ये मंगळवारी आणण्यात आलं. शुक्रवारी रात्री अधिकाऱ्यांच्या दक्षतेखाली ऋषभ पंत याच्यावर लिंगाभेट येथे सर्जरी पार पडली असून जवळपास तीन तास या सर्जरीला लागली असल्याची माहिती मिळत आहे.
ऋषभ पंतला जबर दुखापत- 30 डिसेंबरला शुक्रवारी रात्री दिल्लीहून उत्तराखंड येथे असलेल्या आपल्या घरी जात असताना ऋषभ पंतच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वतः गाडी चालवत होता. या अपघातात ऋषभ पंतला जबर दुखापत झाली. ऋषभ पंत याच्यावर आतापर्यंत देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र ऋषभ पंत याच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली असल्याने लिंगामेट सर्जरीसाठी ऋषभ पंत याला पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल.
ऋषभ पंतला क्रिकेटपासून राहावे लागणार दूर - त्यानंतर ऋषभ पंतला एअरलिफ्ट करून मुंबईला उपचारासाठी आणण्यात आलं. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये डॉ. दीनशॉ पादरीवाला हे ऋषभ पंत यांच्यावर पुढील उपचार करणार आहेत. त्यांच्या देखरेखीखाली एक टीम रिषभ पंत याचा पुढील उपचार करेल. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ऋषभ पंत याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. बीसीसीआयकडून ऋषभ पंत याच्या उपचारावर देखरेख ठेवण्यात येत आहे. ऋषभ पण त्यांच्या आरोग्याबाबत मिळालेला प्राथमिक माहितीनुसार ऋषभ पंत याला पूर्णपणे ठीक व्हायला जवळपास सहा ते सात महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे एवढा वेळ ऋषभ पंतला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे.