मुंबई : कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अष्टपैलू युवराज सिंग आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यावर उपचार केले होते. तसेच, रवींद्र जडेजासह काही ऑलिम्पिक खेळाडूंवरही उपचार केले आहेत. आता मुंबईमध्ये रिषभ पंतवर लिगामेंट टियरची सर्जरी होईल. तसेच, त्यानंतरचीही प्रक्रियाही इथेच होणार आहे.
एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणले : २५ वर्षीय रिषभ पंतला देहराडून येथील एका रुग्णालयातून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले आहे. येथे त्याचा गुडघा आणि पायाच्या घोट्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर व्यापक उपचार होईल. (दि. ३० डिसेंबर रोजी) पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, काही दिवस देडराडून येथे उपचार झाल्यानंतर रिषभ पंतला उपचारांसाठी मुंबईत आणण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. रिषभ पंतला सामान्य विमानातून आणता येणे शक्य नसल्याने बीसीसीआयने त्याला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणले आहे.
बीसीसीआयच्या डॉक्टरांचे विशेष पथकांच्या देखरेखीखाली उपचार : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (Rishabh Pant Health Updates) भीषण कार अपघातात जखमी झालेला भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. ऋषभ पंतला डेहराडून येथून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल (Rishabh Pant in HN Hospital in Mumbai ) करण्यात आले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयाचे ( Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) डॉक्टरांचे व बीसीसीआयच्या डॉक्टरांचे विशेष पथकांच्या देखरेखीखाली ऋषभ पंतवर उपचार करण्यात येणार आहे.
पायाच्या गोट्याला गंभीर दुखापत : उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या डॉक्टरांसोबत बीसीसीआयच्या रुग्णालयाचे स्पोर्ट्स मेडिसिन एंड ऑर्थोस्कोपी विभागाचे प्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली उपचार होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी पहाटे दिल्लीहून रुडकी येथील घरी जात असताना रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. नियंत्रण सुटल्यानंतर दुभाजकावर आदळून कारने पेट घेतला होता. सुदैवाने आग लागण्यापूर्वी पंत कारमधून बाहेर आल्याने तो बचावला होता. मात्र त्याचा गुडघ्याला आणि पायाच्या गोट्याला गंभीर दुखापत झाली होती.
बीसीसीआयने काय सांगितले? : पंतला या आजारातून बाहेर पडण्यासाठी सर्व शक्य वैद्यकीय मदत आणि सर्वतोपरी इतरही मदत मिळेल याची काळजी घेतली जाईल. चांगले उपचार आणि लिगामेंटच्या समस्येमुळे ऋषभ पंतला डेहराडूनहून मुंबईला हलवण्यात आले. ऋषभ बीसीसीआयचे ऑर्थोपेडिक डॉक्टर दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली हे उपचार होत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी येथे शस्त्रक्रिया होणार आहे असे सांगितले आहे. तसेच, इंग्लंड किंवा अमेरिकेत हलवण्याची परिस्थिती आली तर तेही करण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली आहेत.
अभिनेता शाहरूख खानच्या शुभेच्छा : ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेता शाहरूख खानने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहे. ऋषभ पंत एक योद्धा आहे, असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.
गुडघ्याला जबर मार : दिल्लीहून 30 डिसेंबरच्या पहाटे कारने उत्तराखंडमधील रुरकी येथे आईला सरप्राईज देण्यासाठी ऋषभ पंत जात होता. यावेळी रुरकी मध्ये दुभाजकाला धडकून कारचा अपघात झाला. अपघातात कार जळून पूर्णतः खाक झाली. पंत या अपघातात गंभीर जखमी झाला. पंतच्या डोक्याला, गुडघ्याला आणि घोट्याला जबर दुखापत झाली. रुरकी येथील रुग्णालयात तातडीने उपचार केल्यानंतर त्यांना डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. जिथे त्याच्यावर खाजगी वार्डात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.