ETV Bharat / state

Richest Ganpati in Country : देशातील सर्वात श्रीमंत गणपती बघण्यासाठी भाविकांची गर्दी; कुठे आहे सर्वात श्रीमंत गणपती? - GSB Ganpati Mandal

Richest Ganpati in Country : देशातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील किंग सर्कल येथील जीएसबी गणपती मंडळात यंदा भाविकांची गर्दी 40 टक्क्यांनी वाढलीय. जीएसबी गणपती मंडळाकडून काढला जाणारा कोट्यावधी रुपयांचा विमा यासाठीही हा गणपती प्रसिद्ध आहे.

Richest Ganpati in Country
Richest Ganpati in Country
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 1:07 PM IST

Updated : Sep 22, 2023, 1:57 PM IST

देशातील सर्वात श्रीमंत गणपती बघण्यासाठी भाविकांची गर्दी

मुंबई Richest Ganpati in Country : मुंबईतील किंग सर्कल येथील प्रसिद्ध जीएसबी (गौड सारस्वत ब्राह्मण) गणपती मंडळात यंदा गणेश भक्तांची गर्दी ४० टक्क्यांनी वाढली असून मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी इथं दिसून येत आहे. विशेष म्हणजे जीएसबी मंडळातील गणपतीची मूर्ती ही देशातील सर्व गणपती मुर्त्यांमध्ये श्रीमंत मूर्ती आहे. याठिकाणी मुंबई, महाराष्ट्रासह देश विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. जीएसबी गणपती नवसाचा गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे.

मुर्तीवर ६६ किलो सोने व २९५ किलो चांदीचे अलंकार : देशातील सर्वात श्रीमंत गणेशाची मूर्ती म्हणून जीएसबी गणपतीची मूर्ती प्रसिद्ध आहे. यंदा जीएसबी मंडळाच्या गणपतीच्या मूर्तीवर तब्बल ६६ किलो सोने व २९५ किलो चांदीचे अलंकार चढवले गेले आहेत. सोन्या-चांदीचे अलंकार व या मंडळाकडून काढला जाणारा कोट्यावधी रुपयांचा विमा यासाठी हा गणपती प्रसिद्ध असला तरी इथं दिला जाणारा प्रसादही फार प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पाच्या दर्शना बरोबर प्रसाद घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी याठिकाणी दिसून येते. नवसाचा गणपती म्हणूनही प्रसिद्ध असलेल्या या गणपतीकडे नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी सुद्धा दूरवरून गणेश भक्त येतात. विशेष म्हणजे दर्शनासाठी झालेली अलोट गर्दी बघता दर्शन घेताना भक्तांना कुठल्याही पद्धतीने असुविधा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत. यंदा गणपती बाप्पाची पूजाअर्चा करण्यासाठी बंगळूर व हरिद्वार येथून पंडित मुंबईमध्ये आले आहेत.

भाविकांची गर्दी 40 टक्क्यांनी वाढली : यंदा भाविकांची गर्दी 40 टक्क्यांनी वाढली असून प्रसादही कमी पडू लागला आहे. इथं येणारा प्रत्येक भाविक हा विशेष करून दर्शनाबरोबर प्रसाद म्हणून जे भोजन देतो त्याची सुद्धा आवर्जून सेवा घेत असतो, अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते अमित पै यांनी दिलीय. गणपती बाप्पावर असणारा भाविकांचा विश्वास हा दिवसेंदिवस वाढत चालला असून भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून आता जीएसबीचा गणपती प्रसिद्ध होऊ लागल्याचंही मंडळाचे प्रवक्ते अमित पै यांनी सांगितलंय.

३६०.४५ कोटी रुपयांचा विमा : मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ म्हणून तसेच सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीएसबी मंडळाने यावर्षी तब्बल ३६०.४५ कोटी रुपयांचा विमा काढलाय. देश विदेशातील गणेश भक्तांचे आकर्षण असणाऱ्या लालबागचा राजा मंडळानं २६.५४ कोटी रुपयांचा विमा उतरवलाय. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून दरवर्षी अनेक भाविक येत असतात त्याचप्रमाणे जीएसबी गणपतीच्या दर्शनासाठीही देश विदेशातून मोठ्या संख्येत भाविक येत असतात. विशेष म्हणजे जीएसबी मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचाही ३० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आलाय. गणेशोत्सवादरम्यान येथे २०० हून अधिक स्वयंसेवक कार्यरत असतात या सर्वांसाठीही विशेष विमा काढण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. Richest Ganpati in Mumbai : काय सांगता! 69 किलो सोन्यासह 336 किलो चांदीनं बनली 'या' बाप्पाची मूर्ती
  2. Ganeshotsav २०२३ : 'लालबाग राजा'च्या दर्शनाला विदेशी पाहुण्यांची गर्दी, पाच किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा
  3. Ganeshostav 2023 : मुंबईच्या राजापुढं 'शिवराज्याभिषेक सोहळा'; कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावरुन आणलीय माती... पहा व्हिडिओ

Last Updated : Sep 22, 2023, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.