मुंबई - दिव्यांश नाल्यात पडल्याच्या घटनेला ३६ तास उलटले आहेत. तरीही माझा मुलगा सापडलेला नाही. शोधपथक वरवरची शोधमोहीम राबवत आहे. दिव्यांश मिळाला नाही, तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी केली आहे.
दिव्यांश न सापडल्याने आज गोरेगाव पूर्वमधील आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही खबरदारी घेत दिंडोशी पोलिसांनी तेथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. श्रवण तिवारीला पोलिसांनी आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले आहे.
दिव्यांश ज्या ठिकाणी नाल्यात पडला होता त्याच्या आसपासच आता शोध मोहीम राबवण्यात येत आहे.