ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फज्जा... पवई विहारलेकवर नागरिकांची तोबा गर्दी - mumbai powai lake news

एकीकडे कोरोनाचे संकट असताना प्रशासनाकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल ५ महिन्यापासून घरात असणाऱ्या नागारिकांनची काळजी घेत प्रशासनाकडून जनजीवन हळूहळू पुर्वपदावर करण्यात येत आहे. परंतु काही बेशिस्त निष्काळजी लोकांमुळे कोरोनाचा आजार आणखीन फोफावेल अशी चिंता सद्या पवई भांडूप आणि पूर्व उपनगरातील नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे या बेशिस्त निष्काळजी लोकांवर कठोर कारवाईची मागणी पवईकर करत आहे.

repentance-crowd-of-citizens-at-powai-vihar-lake
लॉकडाऊनचा फज्जा... पवई विहारलेकवर नागरिकांची तोबा गर्दी
author img

By

Published : Aug 17, 2020, 2:50 PM IST

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असणारा पवई विहार लेक तलाव हा किही दिवासांपूर्वी ओसंडून वाहू लागला होता. या विहारलेक तलावावर फिरण्यास निर्बंध असले तरी नियम पायदळी तुडवत लॉकडाऊनचा फज्जा उडवत काही हौशी लोकांनी येथे तुडुंब गर्दी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकीकडे कोरोनाचे संकट असताना प्रशासनाकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल ५ महिन्यापासून घरात असणाऱ्या नागारिकांनची काळजी घेत प्रशासनाकडून जनजीवन हळूहळू पुर्वपदावर करण्यात येत आहे. परंतु काही बेशिस्त निष्काळजी लोकांमुळे कोरोनाचा आजार आणखीन फोफावेल अशी चिंता सद्या पवई भांडूप आणि पूर्व उपनगरातील नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे या बेशिस्त निष्काळजी लोकांवर कठोर कारवाईची मागणी पवईकर करत आहे.

पवई येथील विहार तलावावर प्रशासनाने संचारण्यास बंदी घातली आहे. परंतु पालिकेच्या कुचकामी कामामुळे काही लोकं या तलावावर सहलीसाठी येत असतात. परंतु पालिकेकडून या तलावावरील सुरक्षेबाबत कसल्याच उपाययोजना केल्या नसल्याने काही बेशिस्त लोकं या तलावर मुक्त संचार करत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी अनेकदा अनेक लोकांनी आपला जीवही गमवला आहे. परंतू मागील काही दिवसांपासून पावसामुळे हा तलाव वाहत असताना या वाहत्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी तुडुंब गर्दी करत हे लोक मोठ्या संकटाला आमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवून हा परिसरात पूर्ण निर्बंध लावावा आणि सुरक्षा रक्षक व पोलिस तैनात करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक हर्षवर्धन घाडगे यांनी केली आहे.

विहार तलाव बाबत....

विहार तलाव हा दोन सर्वात लहान तलावांपैकी एक असून यापैकी तुळशी तलाव हा दुसरा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर म्हणजेच, ९ कोटी लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा विहार तलाव आहे. या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले. तेव्हा तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७ हजार ६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.