ETV Bharat / state

रेणू शर्माचा कृष्णा हेगडेंवर पलटवार, म्हणाली हा तर प्रतिमा मलिन करण्याचा डाव

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणारी महिला रेणू शर्मा हिच्या विरोधात भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनीसुद्धा तक्रार दाखल केली आहे. या आरोपांना रेणू शर्माने ट्विटरवरून उत्तर दिले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 15, 2021, 10:35 AM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणारी महिला रेणू शर्मा हिच्या विरोधात भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनीसुद्धा तक्रार दाखल केली आहे. 2010 पासून सदरची महिला आपल्याला व्हॉट्सअ‌ॅपवरून सतत मेसेज करून संपर्क साधून मैत्री करण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांना रेणू शर्माने ट्विटरवरून उत्तर दिले आहे.

रेणू शर्माने केलेले ट्विट
रेणू शर्माने केलेले ट्विट

रेणू शर्माने ट्विट करत आरोप फेटाळले -

कृष्णा हेगडे यांनी माझ्यावर केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. समाजात माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच धनंजय मुंडे विरोधात तक्रार दाखल करण्यापासून माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न हेगडे करत आहेत. धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करत असल्यानेचे माझ्यावर खोटे आरोप होत आहेत.

माझ्यावर हनी ट्रॅप लावल्याचा आरोप होत आहे. मात्र, मी असे काहीच केलेले नाही. प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत माझी आणि कृष्णा हेगडे यांची भेट झाली. त्यावेळी कृष्णा हेगडे यांनीच माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली, असे ट्विट रेणू शर्माने केले आहे.

आंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि कृष्णा हेगडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यासोबत माझा कुठलाही संबंध नसून 2010 पासून रेणु शर्मा नावाची महिला मला सतत फोन करून माझ्यासोबत संबंध ठेवण्याची बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या महिलेला बॉलिवूडमध्ये गायिका म्हणून नाव कमवायचे होते. त्यासाठी ती माझी मदत घेण्यासाठी सतत मला फोन करून संबंध ठेवण्यासाठी सांगत होती. 6 जानेवारी 2020 रोजीसुद्धा या महिलेने संपर्क करून यासंदर्भात संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला होता. दरम्यान आपण आंबोली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार देत असल्याचेही हेगडे यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले हेगडे?

धनंजय मुंडे यांच्यासोबत माझा कुठलाही संबंध नाही. मात्र याप्रकरणी आणखी कोणी बळी पडू नये, म्हणून मी तक्रार दाखल करत आहे. 6 व 7 जानेवारी रोजी पुन्हा एकदा रेणू शर्मा या महिलेने कृष्णा हेगडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.

कोण आहेत कृष्णा हेगडे?

कृष्णा हेगडे हे एकेकाळी मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते मानले जात होते. 2009मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली होती व ते निवडूनसुद्धा आले होते. मात्र 2014मध्ये त्यांचा पराभव झाला होता. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती. काँग्रेस सोडत असताना त्यांनी संजय निरुपम यांच्यावर आरोप केला होता, की ते पक्षाशी निष्ठावंत असलेल्या नेत्यांना जाणून-बुजून अपमानास्पद वागणूक देत आहेत. यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे जावई म्हणून कृष्णा हेगडे यांची ओळख आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.