ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ : वैद्यकीय तपासणीनंतरच मुंबईतील स्थलांतरितांंना घरी सोडा - पालिका आयुक्त - मुंबई कोरोना बातमी

या वादळामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने मुंबई शहर व उपनगरात 35 ठिकाणी तात्पुरते निवारे उभारले होते. त्यापैकी काही निवारे पालिकेच्या शाळांमध्ये होते. या निवाऱ्यांमध्ये समुद्रकिनारी राहणाऱ्या 18 हजार 887 नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

cyclone nisarga
निसर्ग चक्रीवादळ
author img

By

Published : Jun 3, 2020, 8:48 PM IST

मुंबई - मुंबईत निसर्ग चक्रीवादळ आज (बुधवारी) येणार होते. त्यापार्श्वभूमीवर मुंबईमधील समुद्रकिनारी राहणाऱ्या 18 हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना घरी सोडावे, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने आज मुंबईत निसर्ग चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली होती. या वादळामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने मुंबई शहर व उपनगरात 35 ठिकाणी तात्पुरते निवारे उभारले होते. त्यापैकी काही निवारे पालिकेच्या शाळांमध्ये होते. या निवाऱ्यांमध्ये समुद्रकिनारी राहणाऱ्या 18 हजार 887 नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. स्थलांतरित सर्व नागरिकांना एक दिवस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये ठेवावे. त्यांची स्क्रिनिंग केल्यावर ज्यांच्यामध्ये कोरोनाची लागण दिसून येईल अशा नागरिकांना कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवावे व ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसणार नाहीत त्यांना घरी सोडावे, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

का दिले आदेश -

समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांना पालिकेने तातपुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले. स्थलांतरित करताना पालिकेच्या वाहनांमध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये फिजिकल डिस्टनसिंग न ठेवता नागरिकांना भरण्यात आले. ज्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये नागरिकांना ठेवले त्याठिकाणी कमी जागेत जास्त नागरिक राहात असल्याने सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.