मुंबई : राज्यामध्ये कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांची संख्या ( Students Increased After Corona ) वाढली. यामुळे सरकारी शाळेमधील पटसंख्या वाढल्याची गोष्ट आनंदाने शालेय शिक्षण मंत्री यांनी स्वीकारले. मात्र राज्यात 67,000 च्या आसपास शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पदांबाबत शासनाच्या पत्राद्वारे ही बाब दोन महिन्यांपूर्वी उघड झाली ( Teacher Recruitment in Maharashtra ) होती. आता सेवानिवृत्त शिक्षक भरण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन ( Retired Teacher Recruitment ) आहे. या मागे नवीन शिक्षक भरती न करण्याचा विचार आहे की काय अशी शिक्षक क्षेत्रातून प्रतिज्ञा उमटलेली आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांची भरती : राज्यामध्ये इयत्ता पहिली ते दहावी यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिकत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी शिवाय विद्यार्थी आहेत. या संदर्भात अनेकदा धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मात्र तरीही शिक्षकांची भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही. आता सेवानिवृत्त शिक्षक यांना शाळांमध्ये शिकवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आलेली आहे.
पात्र शिक्षक बेरोजगार : यासंदर्भात शिक्षण तज्ञ अरविंद वैद्य यांच्यासोबत ईटीवीने बातचीत केली असता,' त्यांनी शासनाचा हा प्रस्ताव म्हणजे शिक्षक भरतीला खूप घालणारा असल्याचे म्हटले आहे.' ते पुढे म्हणतात की," सेवानिवृत्त शिक्षक यांची तब्येत त्यांना वयोमानानुसार दगदग आणि काम झेपणारे नसते आणि नवीन पात्र शिक्षक बेरोजगार ( Retired Teacher Recruitment ) आहेत. ते नोकरी मिळण्याची वाट पाहत आहे. त्यांना पदभरती करायचे सोडून सेवानिवृत्त शिक्षकांना यामध्ये सामावून घेणे म्हणजेच बेरोजगार पात्र शिक्षकांना नोकरीपासून वंचित ठेवणे आहे." अखिल भारत शिक्षा अधिकार मंचाचे अक्षय पाठक यांनी सांगितले,"राज्यामध्ये 67 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पत्र शिक्षण आयुक्त पुणे यांनी शासनाला लिहिल्याचं प्रसारित झालं होतं. त्यावरनं प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या देखील आल्या. मात्र आज रोजी शिक्षणाचा दर्जा शालेय गुणवत्ता शिक्षकांशिवाय सुधारणार नाही ही काळा दगडावरली रेघ आहे तरीही शासन याबाबत गंभीर नाही."