मुंबई : मुंबईत स्वच्छ्ता राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार, संपूर्ण मुंबईसाठी ५ हजार स्वच्छतादूत नेमले ( 5 Thousand Swachta doot In Mumbai ) जाणार आहे. हे स्वच्छतादूत कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत, तर देखरेख व जागरुकतेवर भर देणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ( Focus On Awareness Clean Mumbai ) दिली.
५ हजार स्वच्छतादूत : महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, माझी मुंबई स्वच्छ मुंबई मोहीम आदींचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त तसेच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक ( Mumbai Municipal Corporation Sanitation ) घेतली. या बैठकीत जी २० परिषदेच्या मुंबईतील पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरी सेवा-सुविधांची कामे व सुशोभीकरण अत्यंत वेगाने केले, त्याबद्दल नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जी २० मधील भारताचे शेरपा अमिताभ कांत यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. हीच धडाडी व वेग कायम ठेऊन आता सर्व उपक्रमांमध्ये निश्चित केलेले लक्ष्य गाठावे, असे निर्देशही चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासाठी संपूर्ण मुंबईसाठी ५ हजार स्वच्छतादूत नेमले जाणार असून त्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेत आमूलाग्र बदल दिसून येईल. असेही डॉ. चहल यांनी नमूद केले आहे.
हे दिले निर्देश : मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत होत असलेल्या कामांच्या अंमलबजावणीचा विभाग कार्यालय स्तरावर दर आठवड्याला तर परिमंडळ स्तरावर दर पंधरवड्याला आढावा घ्यावा. सुशोभीकरण अंतर्गत होणा-या कामांची प्रगती व गुणवत्तेवर लक्ष ( No Action Will Be Taken ) ठेवावे.
- पाच हजार स्वच्छतादूत नेमायचे असून प्रत्येक १० स्वच्छतादूतांमागे १ पर्यवेक्षक नियुक्त करावा. हे स्वच्छतादूत क्लीनअप मार्शलप्रमाणे दंडात्मक कारवाई करणारे नसतील, दिलेल्या भागात दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलन देखरेख करतील तसेच जनजागृतीसाठी मदत करतील.
- मुंबईत जिथे-जिथे अरुंद वसाहती, गल्ली तसेच झोपडपट्टी आहेत, त्या परिसरांमध्ये प्रखर दिवे (हायमास्ट) लावावेत. मुंबईत मिळून किमान ५०० हायमास्ट येत्या ३ महिन्यात उभारावेत
- आवश्यक आहे, तिथे नवीन प्रसाधनगृहे बांधण्याची कार्यवाही सुरु करावी. त्याचप्रमाणे खास व फक्त महिलांसाठी राखीव असलेली व सर्व सुविधांयुक्त किमान २०० प्रसाधनगृहे मुंबईत तयार करावीत.
- प्रधानमंत्री स्व-निधी योजना अंतर्गत फेरीवाल्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण २ लाख उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.