मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. योग दिनाचे औचित्य साधून सोमवार 21 जून पासून 30 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरणाला या वयोगटातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने दिवसभरात 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 45 लाख 70 हजार 915 लसीचे डोस देण्यात आले आहेत. बहुतेक लोकांचे नंबर न आल्याने लस न घेताच त्यांना घरी परतावे लागले.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत सोमवारी 1 लाख 8 हजार 148 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 93 हजार 58 लाभार्थ्यांना पहिला तर 15 हजार 90 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 45 लाख 70 हजार 915 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 36 लाख 75 हजार 925 लाभार्थ्यांना पहिला तर 8 लाख 94 हजार 990 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 13 हजार 683, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 68 हजार 172, जेष्ठ नागरिकांना 13 लाख 50 हजार 235, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 13 लाख 92 हजार 453 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 11 लाख 39 हजार 108, 3 हजार 110 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 4 हजार 154 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
सोमवारी रेकॉर्ड ब्रेक -
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान सुरुवातीला दिवसाला 40 ते 50 हजार लसी दिल्या जात होत्या. गेल्या काही दिवसात 70 ते 93 हजार लसीकरण केले जात होते. सोमवारी 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारीपासून आतापर्यंतचे हे सर्वाधिक लसीकरण आहे.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले आहे. 21 जूनपासून राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले जात आहे. मुंबईत सध्या 50 टक्के वॉकइन तर 50 टक्के नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिला, परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी, परदेशात नोकरी करण्यासाठी जाणारे नागरिक, ऑलम्पिकमध्ये भाग घेणारे खेळाडू आदींचे लसीकरण केले जात आहे.
युवकांची गर्दी -
मुंबईत सोमवारपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांनी गर्दी केली होती. 30 ते 44 वयातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तर लसीकरण केंद्रांवर ठराविक लसीचा साठा उपलब्ध करून देण्यात आल्याने त्याव्यतिरिक्त इतर नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागले.
एकूण लसीकरण -
- आरोग्य कर्मचारी - 3,13,683
- फ्रंटलाईन वर्कर - 3,68,172
- जेष्ठ नागरिक - 13,50,235
- 45 ते 59 वय - 13,92,453
- 18 तर 44 वय - 11,39,108
- स्तनदा माता - 3,110
- परदेशी शिक्षण विद्यार्थी - 4,154
- एकूण - 45,70,915
हेही वाचा - दिलासादायक! राज्यात सोमवारी 6,270 कोरोना रुग्णांची भर; 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू