मुंबई: आरसीएफ पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम ३९४, ३८५, ५०६ (२), ३४ भा.द.वि. सह कलम ३७ (१) (अ), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्हयाच्या तपासात असे निष्पन झाले की, रमेश बुधीराम जैस्वाल उर्फ जैसवार उर्फ गुल्लू उर्फ गोलू, वय २५ वर्षे हा इसम आर. सी. एफ. व ट्रॉम्बे पोलीस ठाणे हद्दीत आणि लगतच्या परिसरात दहशत निर्माण करून प्राणघातक हत्यारे जवळ बाळगुन मारामारी करणे, जबरी चोरी करणे, महिलांचे विनयभंग करणे, खंडणी मागणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून त्याची दहशत पसरवून सार्वजनिक शांतता व सुरक्षितेतसाठी धोकादायक व्यक्ती झाला असुन त्याचे विरुद्ध आर सी एफ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद आहेत. हा इसम बुध्दविहार जवळ, सहयाद्रीनगर बी, बाशीनाका, चेंबूर येथे राहतो.
मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध: गुल्लूविरुद्ध सन २०१४ पासुन गुन्हे नोंद असुन त्याच्याविरूद्ध यापूर्वी फौजदारी दंड प्रकीया संहिता व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर सी एफ पोलीस ठाणे यांनी रमेश बुधीराम जैस्वाल याचे विरुद्ध दाखल गुन्हयाचे अनुषंगाने एम.पी. डी. ए. कायदा १९८१ अन्वये स्थानबध्द कार्यवाहीसाठी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ६, मुंबई यांचे मार्फतीने पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी २१ फेब्रुवारीला रमेश बुधीराम जैस्वाल यास स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केल्याने त्याला २३ फेब्रुवारीला ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.
पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा: जानेवारी २०२३ पासून परिमंडळ ६ अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ति दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (M.P.D.A) १९८१ अन्वये केलेली ही पहिली कारवाई असून यापूर्वी देखील आर सी एक पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी कार्तिक अण्णादुराई देवेंदर उर्फ बाबु व राजेश नारायण पिल्ले याचेविरुद्ध एम पी डी ए कायदयाखाली कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे व वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नसुन त्यांच्या विरुद्ध भविष्यात देखील अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा: Palghar Crime : धक्कादायक! दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात