ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंचा झाडे तोडायला विरोध, तर उद्धव ठाकरे मेट्रो भवनच्या भूमीपूजनात व्यस्त - आरे बातमी

मेट्रोसाठी आरेमधील झाडे तोडण्यास मंजुरी दिल्यानंतरही शिवसेनेचा झाडे तोडण्याला विरोध असल्याचे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे आदित्य ठाकरे झाडे तोडायला विरोध करत असताना उद्धव ठाकरे मात्र पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो भवनच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे, मुंबईकर नागरिकांमध्ये शिवसेनेच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित झाली आहे.

उद्धव ठाकरे मेट्रो भवनच्या भूमीपूजनात व्यस्त
author img

By

Published : Sep 15, 2019, 10:40 PM IST

मुंबई - मेट्रोच्या कारशेडसाठी आरे येथील झाडे तोडली जाणार आहेत. याला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. मात्र, आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे उपस्थित राहतात, हा कसला विरोध असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांमध्ये शंका उपस्थित होत असल्याने त्याचा खुलासा करावा अशी मागणीही रवी राजा यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते रवी राजा

मुंबईत प्रदूषण कमी करण्याच्या नावावर मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मेट्रोसाठी गोरेगाव आरे येथे कारशेड उभारले जाणार आहे. या कारशेडसाठी २७०० झाडे तोडली जाणार आहेत. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विरोध असल्याने हा झाडे तोडण्याचा प्रस्ताव दोन वर्षे रखडला होता. नुकतीच या वृक्ष तोडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेनेही मेट्रो रेल कॉर्पोरेशनला झाडे तोडून त्याबदल्यात ३० दिवसात १३,११० झाडे लावण्यास सांगितले आहे. मेट्रोसाठी आरेमधील झाडे तोडण्यास मंजुरी दिल्यानंतरही शिवसेनेचा झाडे तोडण्याला विरोध असल्याचे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो कोचचे उदघाटन केले. तसेच आरे येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनाचे भूमिपूजन केले. मेट्रो भवन बांधण्यासाठीही अनेक झाडे तोडली जाणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

हेही वाचा - 'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...

एकीकडे आदित्य ठाकरे झाडे तोडायला विरोध करत असताना उद्धव ठाकरे मात्र पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो भवनच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे, मुंबईकर नागरिकांमध्ये शिवसेनेच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्या विरोधी भूमिकेबाबत खुलासा करावा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

हेही वाचा - वर्ष उलटूनही पूर्णपणे प्लास्टिक बंदी नाही, मुंबईत प्लास्टिकचा खुलेआम वापर

Intro:मुंबई - मुंबईत होणाऱ्या मेट्रोच्या कारशेडसाठी आरे येथील झाडे तोडली जाणार आहे. याला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. मात्र आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे उपस्थित राहतात. हा कसला विरोध असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये शंका उपस्थित होत असल्याने त्याचा खुलासा करावा अशी मागणी रवी राजा यांनी केले आहे.Body:मुंबईत प्रदूषण कमी करण्याच्या नावावर मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मेट्रोसाठी गोरेगाव आरे येथे कारशेड उभारले जाणार आहे. या कारशेडसाठी २७०० झाडे तोडली जाणार आहेत. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विरोध असल्याने हा झाडे तोडण्याचा प्रस्ताव दोन वर्षे रखडला होता. नुकतीच या वृक्ष तोडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेनेही मेट्रो रेल कॉर्पोरेशनला झाडे तोडून त्याबदल्यात ३० दिवसात १३,११० झाडे लावण्यास सांगितले आहे.

मेट्रोसाठी आरेमधील झाडे तोडण्यास मंजुरी दिल्यानंतरही शिवसेनेने आपला झाडे तोडण्याला विरोध असल्याचे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो कोचचे उदघाटन केले. तसेच आरे येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनाचे भूमिपूजन केले. मेट्रो भवन बांधण्यासाठीही झाडे तोडली जाणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

एकीकडे आदित्य ठाकरे झाडे तोडायला विरोध करत असताना उद्धव ठाकरे मात्र पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो भवनच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असल्याने मुंबईकर नागरिकांमध्ये शिवसेनेच्या झाडे तोडण्याच्या विरोधाबाबत शंका उपस्थित झाली आहे. यामुळे आरेच्या विरोधाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच खुलासा करावा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

बातमीसाठी मेट्रोच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे उपस्थित असल्याचा फोटो
विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा बाईट
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.