ETV Bharat / state

Both Accused Arrested : चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणारे दोन्ही आरोपीं अटकेत

मुंबईच्या धारावी परिसरात काही दिवसापुर्वी 19 वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार (Rape in fear of a knife) करण्यात आला होता. या प्रकरणी धारावी पोलिसांनी 11मे रोजी गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी आज दोन्ही आरोपीना अटक ( Both the accused have been arrested) केली आहे.

Dharavi Police Thane
धारावी पोलिस ठाणे
author img

By

Published : May 16, 2022, 10:32 PM IST

मुंबई: धारावी पोलिसांनी या संबंधात केलेल्या तपासात अनिल जुगदेव चौहाण, आणि निलेश जुगदेव चौहाण या दोघांची नावे समोर आली. हे दोन्ही आरोपी विलेपार्ले पश्चिमेतील प्रेम नगर येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी सख्खे भाऊ आहेत. या दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली ( Both the accused have been arrested) त्यांना मंगळवारी लावा न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे.

आरोपींनी बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले तसेच चाकुचा धाक दाखवत बलात्कार केला (Rape in fear of a knife) अशी तक्रार पीडितेने केली होती. यावरुन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत अधिक तपास केला. दोन्ही आरोपीविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376,376 (डी),425, 354,(ए) 354(बी), 354(डी), 506(2), भादवि सह कलम 67,67 (अ),66(इ ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे.

धारावी परिसरात तक्रारदार 19 वर्षीय तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहण्यास आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसल्या. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार केला. यावेळी एका आरोपीकडून या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.