ETV Bharat / state

रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये; प्रवेशद्वारावर पवार स्वागत करत असल्याचा फलक - NCP

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा आज भाजप पक्षामध्ये प्रवेश होत आहे. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गरवारे सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच शरद पवार सर्व पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचा विरोधाभास यावेळी पाहायला मिळत आहे.

स्वागताचा फलक
author img

By

Published : Mar 20, 2019, 1:19 PM IST

मुंबई - रणजितसिंह मोहिते पाटील यांचा आज भाजप पक्षामध्ये प्रवेश होत आहे. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गरवारे सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच शरद पवार सर्व पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचा विरोधाभास यावेळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, त्यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील समर्थकांसोबत ईटीव्हीच्या प्रतिनीधीने संवाद साधला.

कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गडहिरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गरवारे हॉलमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या हॉलच्या प्रवेशद्वारावरच शरद पवार स्वागत करत असल्याचे सभागृहाबाहेरील फलकावर लिहले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.