ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करा, अन् शरद पवारांना अध्यक्ष करा, आठवलेंचा सल्ला - Ramdas Athawale latest news

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, की काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे.

रामदास आठवले
रामदास आठवले
author img

By

Published : Sep 5, 2020, 7:11 PM IST

Updated : Sep 5, 2020, 8:24 PM IST

मुंबई- काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी काँग्रेसला दिला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, की काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. काँग्रेस आणि शरद पवार यांनी याबाबत सर्वस्वी निर्णय घ्यावा, असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगायला विसरले नाहीत.

पुढे आठवले म्हणाले की, काँग्रेस हा देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे.

कधी काळी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष 100 खासदारही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी मूळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे शरद पवार यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपवावे, अशी माझी सूचना आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विसर्जन करावे, असे आवाहन करत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, रामदास आठवले यांनी यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष विसर्जित करण्याचा सल्ला शरद पवारांना दिला होता. अभिनेत्री कंगना रणौतला शिवसेनेच्या नेत्यांनी धमकी दिल्यानंतर मुंबईत आल्यानंतर संरक्षण देऊ, असे नुकतेच आठवले यांनी विधान केले आहे.

Last Updated : Sep 5, 2020, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.