मुंबई - महाराष्ट्रात राजकीय नाट्य अद्याप सुरू आहे. याबाबत नेमके पुढील दिवसात कोणाचे सरकार सभागृहात दिसणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकासआघाडीने आज 162 आमदारांच्या सह्या असणारे पत्र राजभवनात सादर केले आहे. मात्र, हा महाविकास आघाडीचा 'फ्लॉप शो' आहे. आमच्याकडे बहुमत आहे, असे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांना हॉटेल ललितमधून लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवले
तर दुसरीकडे भाजपचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे काही जबाबदरी दिली आहे, असे बबनराव पाचपुते यांनी सांगितले.
हेही वाचा - महाविकासआघाडीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची राज्यपालांना विनंती
दरम्यान, मुंबई-शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र देऊन महाविकासआघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याची विनंती यात केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचे सह्या केलेले पत्र असून ते आम्ही राज्यपालांना दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर पाठिंब्यासाठी पाहिजे असल्यास या सर्व 162 आमदारांची राज्यपालांपुढे परेड करू, असेही ते म्हणाले आहेत.