ETV Bharat / state

'खातेवाटप करायला महाविकास आघाडीला कसली भीती वाटते'

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आशा तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, आजही हे 6 मंत्री बिन खात्याचे मंत्री म्हणून काम पाहताहेत.

Ram kadam
राम कदम
author img

By

Published : Dec 8, 2019, 5:30 PM IST

मुंबई - राज्यात सरकार स्थापन होऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप करायला नक्की कोणती भीती वाटते? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारने खाते वाटप केले आणि त्याने एखाद्या नेत्याचं समाधान झाले नाही, तर तो मोठा गट निघून जाईल अशी भीती त्यांना वाटते का? अशी शंका राम कदम यांनी उपस्थित केली.

राम कदम, भाजप आमदार

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आशा तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, आजही हे 6 मंत्री बिन खात्याचे मंत्री म्हणून काम पाहताहेत. दुसरीकडे येत्या 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते आहे. महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यातही हे मंत्री बिनखात्याचे राहणार की काय? अशी शंका कायम आहे.

हेही वाचा - 'एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत'

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मंत्रिमंडळ विस्तार हा हिवाळी अधिवेशनानंतरच केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार इतक्यात होणार नाही. हे ठाऊक असल्यानेच भाजप नेते सरकारला आतापासूनच या विषयावर लक्ष्य करताना दिसत आहेत.

9 तारखेला खातेवाटपाचा मुहूर्त ?

विरोधकामधून खाते वाटपावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात असल्यामुळेच 9 तारखेला खाते वाटप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चेला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यामुळे आता खाते वाटपासाठी 9 तारखेचा मुहूर्त तरी नक्की ठरतो का? याकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा - स्थगिती सम्राट मुख्यमंत्री, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Intro:राज्यात सरकार स्थापन होऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप करायला नक्की कोणती भीती वाटते असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारलाय. महाविकास आघाडी सरकारने खाते वाटप केले आणि त्यानी एखाद्या नेत्याचं समाधान झालं नाही तर तो मोठा गट फोडून निघून जाईल अशी भीती त्यांना वाटते का..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आशा तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र आजही हे सहा मंत्री बिन खात्याचे मंत्री म्हणून काम पाहतायत. दुसरीकडे येत्या 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. महाविकास आघाडी सरकारच हे पहिलंच अधिवेशन असल्याने त्यातही हे मंत्री बिनखात्याचे राहणार की काय अशी शंका कायम आहे. तस झालं तर विरोधकांच्या हातात ते आयतं कोलीत दिल्यासारखं होईल.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मंत्रिमंडळ विस्तार हा हिवाळी अधिवेशनंतरच केला जाईल अस स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार इतक्यात होणार नाही हे ठाऊक असल्यानेच भाजप नेते सरकारला आतापासूनच या विषयावर लक्ष्य करताना दिसतायत.

9 तारखेला खातेवाटपाचा मुहूर्त..?

दरम्यान विरोधकाकधून खाते वातपावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात असल्यामुळेच 9 तारखेला खाते वाटप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चेला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यामुळे आता खाते वाटपासाठी 9 तारखेचा मुहूर्त तरी नक्की ठरतो का याकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.