ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे - Coronavirus

राज्यात तालुकास्तरावर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्यावतीने (आयएमए) ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्याचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 8, 2020, 7:35 PM IST

मुंबई - एकीकडे राज्यात शहरी भागापासून ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्र संसर्गाचा तिसऱ्या टप्प्यात नाही, असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. समाज माध्यमावर बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे. सध्या १२० रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

राज्यात तालुकास्तरावर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्यावतीने (आयएमए) ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्याचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. मुंबईतील धारावी भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असून सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जेथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तेथे नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे सांगतानाच मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे बंधनकारक केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसून याबाबत आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून तसे घोषित केले जाते, असेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असताना खासगी दवाखाने सुरू करावे, यासाठी टोपे यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयएमएच्या वतीने शहरी भागात मोबाईल आणि कम्युनिटी क्लिनिक तर ग्रामीण भागात रक्षक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. राज्य शासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची आवश्यक ती साधने पुरविण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातूनही उपचार मिळावे, अशी अपेक्षा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.